आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटभर जेवणाचे अमीष देऊन 13-14 वर्षांच्या मुलींना केले जातेय गर्भवती; गर्भपात करण्यास कायद्याची बंदी, हे आहे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबुजा - जगातील सर्वात गरीब राष्ट्रांपैकी एक म्हणून आफ्रिका खंडातील देश नायजेरिया ओळखला जातो. येथे लहान-लहान मुलींच्या गरीबीचा असा गैरफायदा घेतला जात आहे, की ते ऐकूण कुणालाही संताप आल्याशिवाय राहणार नाही. अवघ्या 13 ते 19 वर्षांच्या मुलींना येथे बळजबरी गर्भवती केले जाते. हा गलिच्छ उद्योग लपून नाही, तर खुलेआम केला जात आहे. एवढेच नव्हे, तर या देशातील कायद्यानुसार त्या मुलींना एकदा गर्भधारणा झाल्यास गर्भपात सुद्धा करता येत नाही. देशातील परिस्थिती इतकी हलाखीची आहे, की त्यापैकी अनेक मुली यासाठी स्वतः तयार होतात.


काय करतात हे गलिच्छ काम..?
> जगभरात असे काही उद्योग चालतात जे एकूणच किळस वाटते. प्राण्यांवर होणारे बरेच व्यवसाय आहेत. त्यापैकीच एक बकऱ्यांच्या व्यवसायाला Goat Farming असे म्हटले जाते. परंतु, नायजेरिया या आफ्रिकन देशात Baby Farming नावाचा व्यवसाय केला जातो. नायजेरियात अगदी जनावरांच्या व्यवसायाप्रमाणे, अर्भकांचा व्यवसाय खुलेआम सुरू झाला आहे. बरेच बालिका आश्रम आणि अनाथलय यांत गुंतले आहेत. हे लोक एखाद्या ग्रामीण भागातून अवघ्या 13 ते 19 वर्षांच्या मुलींना पोटभर जेवण आणि कामाचे अमीष देऊन आणतात. यानंतर त्यांना अगदी कोंबड्या आणि बकऱ्यांसारखे कोंबून गर्भवती केले जाते.
> नायजेरियातील परिस्थिती इतकी वाइट आहे की काही लोकांना दोन वेळचे पोटभर जेवण सुद्धा मिळत नाही. अशात बहुसख्येने आई-वडील आणि स्वतःच्या मर्जीने मुली हे काम करत आहेत. अशा मुलींच्या पोटातून जन्मणाऱ्या बाळांना मूल नसलेल्यांना विकले जाते. अशा मुलींना एकदा गर्भधारणा झाल्यास त्यांना गर्भपात करता येत नाही. नायजेरियाच्या कायद्यात गर्भपाताला बंदी आहे. सोबतच, या मुलींवर सशस्त्र सुरक्षा रक्षक 24 तास पहारा देतात. दारिद्र्य आणि मरण्याच्या भीतीने त्या या अत्याचाराला विरोध सुद्धा करत नाहीत.


रेट निश्चित...
मीडिया रिपोर्ट्समध्ये 2015 मध्ये सर्वप्रथम हे सत्य जगासमोर आले होते. साऱ्या जगाला येथे चालणाऱ्या बेबी फार्मिंगची कल्पना आहे. अनेक संस्था त्यांच्या मदतीलाही समोर आल्या. परंतु, सरकार किंवा आंतरराष्ट्रीय समुदायाने या प्रकरणाची अद्याप गंभीर दखल घेतलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथे जन्मणाऱ्या बाळांना देशापेक्षा परदेशात मागणी आहे. यात मुलगा जन्मल्यास त्याच्या बदल्यात 5 हजार अमेरिकन डॉलर आणि मुलगी असल्यास तिचा 4 हजार अमेरिकन डॉलर असा भाव ठरलेला आहे. नायजेरिया सरकार अनाथालयांवर नजर ठेवण्याचा दावा नेहमीच करत असते. परंतु, असली प्रकरणे अद्यापही थांबलेली नाहीत.

बातम्या आणखी आहेत...