आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: मृतदेहाशी शारीरिक संबंध ठेवून गर्भवती झाली ही महिला, जाणून घ्या व्हायरल सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - काही वर्षांपूर्वीची अमेरिकेतील एक खळबळजनक घटना विविध वेबसाइटवर प्रकाशित होत आहे. यात सांगण्यात येत आहे की, अमेरिकेच्या कंसास सिटीमध्ये एका शवागारात काम करणाऱ्या महिलेने मृतदेहाशी शारीरिक संबंध बनवले, ज्यामुळे ती प्रेग्नंट झाली. याप्रकरणी पोलिसांनी तिला 'नेक्रोफीलिया' (मृतदेहासोबत सेक्स) च्या गुन्ह्यात अटक केली. नंतर कोर्टाने 1.71 कोटी रुपयांच्या बाँडवर तिची सुटका केली. तथापि, वाचकांच्या माहितीसाठी विविध ठिकाणी प्रसारित होणारे हे वृत्त पूर्णपणे खोटे आहे. अशी कोणतीही घटना अमेरिकेत झाली नव्हती.

 

अशी होती खोटी कहाणी, जी वाचून प्रत्येकाला बसला धक्का...
> 38 वर्षीय फेलिसिटी ममर्माड्यूक, कन्सास सिटीच्या मॉर्नर ग्लोरी मॉर्च्युरीमध्ये काम करत होती. लेट नाइट शिफ्टमध्ये आल्यावर तिचे काम एक्झामिनेशन टेबलवरील डेडबॉडीची साफ-सफाई करणे आणि अंघोळ घालण्याचे होते. पोलिसांच्या मते, महिलेने सांगितले की, तिने पुरुष मृतदेहाच्या गुप्तांगामध्ये हालचाल पाहिली आणि त्याच्याशी संबंध प्रस्थापित केले.
> महिलेने आपल्या जबाबात हेही सांगितले की, तिला रिलेशनदरम्यान ऑर्गज्मचा आनंद मिळाला. काही दिवसांनी तिचे पीरियड्स मिस झाले, तपासणी केल्यावर ती प्रेग्नंट झाल्याचे आढळले. तिने सांगितले की, डेडबॉडीशिवाय तिने इतर कुणाशीही संबंध प्रस्थापित केले नव्हते. नंतर पोलिसांनी महिलेला तिच्या घरातून अटक केली. तथापि, हे मात्र सांगितले नाही, पोलिसांना महिलेची माहिती कशी मिळाली?
> अनेक न्यूज वेबसाइट्सवर काही दिवसांपूर्वी ही बातमी प्रसिद्ध झाली. ज्यानुसार शवागारात बाहेरची व्यक्ती येऊन मृतदेहांशी शारीरिक संबंध बनवण्याची प्रकरणे समोर आली. परंतु, एखाद्या तरुणीने मृतदेहाशी सेक्स करणे आणि नंतर प्रेग्नंट होण्याचे वृत्त अख्ख्या जगासाठी धक्कादायक होते. snopes.com नावाच्या एका वेबसाइटने ही घटना पूर्णपणे खोटी ठरवली आहे. त्यांनी अनेक न्यूज वेबसाइटच्या वृत्तांचे संशोधन केले व सांगितले की, अमेरिकेत अशी कोणतीही घटना घडलीच नव्हती.


कुठून आली ही बातमी?
> snopes.com च्या वृत्तानुसार, डेड सीरियल न्यूज साइट (deadseriousnews.com) ने हे आर्टिकल पहिल्यांदा पब्लिश केले होते. हे आर्टिकल फक्त एक विनोद म्हणून प्रकाशित करण्यात आले होते. परंतु लोकांनी ते गांभीर्याने घेतले. ही वेबसाइट सटायरिकल वेबसाइट आहे. जी नेहमी वेगवेगळ्या इव्हेंटनिमित्त सटायर आर्टिकल पब्लिश करते. यातील आर्टिकलमध्ये सर्व नावे काल्पनिक असतात.
> याच आर्टिकलचा आधार घेऊन एका फेक न्यूज साइट 'वर्ल्ड न्यूज डेली रिपोर्ट'ने या स्टोरीपासून प्रेरणा घेत एक आर्टिकल पब्लिश केले होते. यात सांगण्यात आले की, एका 26 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. कारण डीएनए टेस्टने कळले की, महिलेचे बाळ मृतदेहाशी रिलेशन बनवल्यानंतर जन्मले होते. त्या डेडबॉडीला पोस्टमॉर्टमसाठी मॉर्च्युरीमध्ये आणण्यात आले होते.
> या वृत्ता महिलेचे नाव जेनिफर बुरॉन्स सांगण्यात आले होते. ती जॅक्सन काउंटी एक्जामिनर सर्व्हिसेसमध्ये असिस्टंट पॅथोलॉजिस्ट होती. तिच्यावर पोलिसांनी दोन वर्षांत डझनभर मृतदेहांशी संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप लावला. यात 17 वर्षांपासून ते 71 वर्षांपर्यंतचे पुरुष मृतदेह सामील होते.
> याच वृत्ताच्या आधारे जगभरातील अनेक वेबसाइट्सनी हे वृत्त छापले. परंतु, आपण चुकीचे वृत्त छापत आहोत हे कुणाच्याच लक्षात आले नाही.

बातम्या आणखी आहेत...