आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलंधर जिल्ह्याचे नेते आणि सरकारी अधिराऱ्यांमधील मारपिटीचा व्हिडिओ व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलंधर, (पंजाब)- सध्या जलंधर शहरातील एका मारहाणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. फगवाडा गेट परिसरात बेकायदेशीर बांधकाम थांबवण्यासाठी गेलेल्या बांधकाम पथकासोबत मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेवेळी तेथे उपस्थित असलेल्या माजी महापौर सुरेश सहगल यांनी विरोध करण्यासाठी गेलेल्या माजी महापौर सुरेश यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. या घटनेचा व्हायरल व्हिडिओ चर्चेचा विषय झाला आहे. ज्यामध्ये दोन्ही पक्ष एकमेकांना मारहाण करत शिवागळ करताना दिसत आहे.

 

> बांधकाम विभागातील अधिकारी दिनेश जोशी यांनी आरोप केला आहे की, रविवारी ते बेकायदेशीर बांधकाम थांबवण्यासाठी गेले होते, त्यासाठी त्यांनी बेकायदा नोटीस जारी केली होती. त्यांना सुचना देण्यात आली होती की, रविवारी सुट्टीचा फायदा घेवून रस्त्यात लँटर टाकले जात आहे. जेव्हा इमारतीचे मालक शर्मा, पुर्व महापौर आणि त्यांच्यासोबत इतर कर्मचारी हे बांधकाम थांबवण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्यासोबत माजी महापौर सुरेश सहगल यांनी मारपिट केली. यानंतर पालिकेचे कर्मचारी आणि दिनेश जोशी यांनी सरकारी रुग्णालयात जावून वैद्यकीय उपचार केल्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सरकारी कामात अडथळा आणून हल्ला केल्याच्या कलमाअंतरर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

 

> पालिकेच्या पथकाचे म्हणणे आहे की, फगवाडा गेट परिसरात अवैध बांधकाम चालू होते.बांधकाम विभागाचे दिनेश जोशी, हेड ड्राफ्टसमन विकास दुआ टीमसोबत बांधकाम थांबवण्यासाठी  गेले असता इमारतीच्या मालकाने माजी महापौर सुरेश सहगल यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर सुरेश सहगल यांनी बांधकाम विभागाच्या टीमला शिवीगाळ केली.

 

बातम्या आणखी आहेत...