Home | Khabrein Jara Hat Ke | Shocking Video of Doctors removed Leech From Throat of Woman

गळ्याच्या त्रासासाठी डॉक्टरकडे गेली होती महिला, ऑपरेशननंतर गळ्यातून असे काही निघाले की नर्सही घाबरून गेली

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 12, 2019, 12:00 AM IST

डॉक्टरांनी सांगितले की, हा जळू महिलेच्या गळ्यात जवळपास 3 महिन्यांपासून होता. त्यामुळे महिलेच्या गळ्यात ट्युमर झाला होता.

 • हा जियांग - व्हिएतनाममध्ये डॉक्टरांनी एका महिलेच्या ऑपरेशनचा एक थरारक व्हिडिओ शेअर केला आहे. येथील एका 63 वर्षीय महिलेच्या गळ्यात काही दिवसांपासून त्रास होता. ती जेव्हा चेकअपसाठी डॉक्टरकडे गेली तर डॉक्टरला तिच्या गळ्यात ट्युमप असल्याचे समजले. तो काढण्यासाठी सर्जरी सुरू झाली तेव्हा गळ्यातून असे काही निघाले की, ते पाहून नर्सला अक्षरशः धक्का बसला.


  गळ्यातून निघाला रक्तपिपासू जळू
  - व्हिडिओमध्ये दिसले की, महिलेचे ऑपरेशन करताना डॉक्टर एका लाईटच्या मदतीने गळ्यामध्ये पाहत होता. त्याचवेळी त्याला गळ्यात काहीतरी काळे आढळले. त्याने ते बाहेर काढले तर सर्वांनाच धक्का बसला.
  - तो एक दोन इंच आकाराचा जळू म्हणजे रक्तपिपासू होता. हे पाहून त्याठिकाणी असलेला स्टाफही घाबरून गेला.

 • Shocking Video of Doctors removed Leech From Throat of Woman

  डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक बाब.. 

  - डॉक्टरांनी सांगितले की, हा जळू महिलेच्या गळ्यात जवळपास 3 महिन्यांपासून होता. त्यामुळे महिलेच्या गळ्यात ट्युमर झाला होता. 


   

 • Shocking Video of Doctors removed Leech From Throat of Woman

  डॉक्टरांच्या मते डोंगरी भागात राहणारी ही महिला एखाद्या तलावात अंघोळीला गेली असता नाक किंवा तोंडातून हा जळू तिच्या शरीरात गेला असेल. त्यावेळी जळू लहान आकाराचा अशेल.पण रिक्त पिऊन तो मोठा बसला आणि त्यामुळे महिलेचा त्रासही वाढला. 

Trending