आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजूनागड - गीर अभयारण्यातील सिंहिणीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. अभायरण्यातील जंगली प्राण्यांचा कसा छळ करून स्वतःचे जीव धोक्यात टाकले जाते हे या व्हिडिओतून दिसून येत आहे. या घटनेमुळे सिंह आणि त्यांच्या प्रजातीच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, नुकतेच समोर आलेल्या एका आकडेवारीनुसार, अमरेली जिल्ह्यातील दलखाणिया हद्दीत कॅनाइन डिस्टेंपर व्हायरल (सीव्हीडी) आणि अंतर्गत फायटिंग इत्यादी कारणांमुळे 23 सिंहांचा मृत्यू झाला आहे. सिंहांच्या घटत्या संख्येवर चिंतीत होऊन त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे दावे करण्यात आले. त्यानंतरही हा व्हिडिओ समोर आला आहे.
सिंहिणीच्या डोक्यावर मारली थाप
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती खुर्चीवर बसून सिंहिणीला कोंबडी दाखवतो आणि आपल्या जवळ बोलावण्याचा प्रयत्न करतो. सिंहिणी अगदी जवळ आल्यानंतरही त्या माणसाच्या चेहऱ्यावरील असुरी हास्य जात नाही. तो तिला चकवा देऊन खेळण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे सहकारी मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ बनवतात. यानंतर सिंहिणी अचानक झेप घेत कोंबडीला आपल्या जबड्यात धरते. यावेळी सुद्धा तो माणूस सिंहिणीच्या डोक्यावर एक थाप मारतो आणि ती निघून जाते. गीरच्या जंगलातून अशाच प्रकारचा एक व्हिडिओ 6 महिन्यांपूर्वी देखील समोर आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.