Home | International | Pakistan | Shocking Video of Pakistani armymen killing civillian in Balochistan

पाकिस्तानी लष्कराचा सैतानी चेहरा; तो अल्लाह-अल्लाह करत होता, सैनिकाने केला बेछूट गोळीबार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 13, 2019, 02:44 PM IST

बलूच फ्रीडम मूवमेंटचे कार्यकर्ते बीबग्र बलोच यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला.

  • Shocking Video of Pakistani armymen killing civillian in Balochistan

    इंटरनॅशनल डेस्क - पाकव्याप्त काश्मिरात स्थानिकांच्या जीवाला काहीच मोल नाही. त्यातच पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या अत्याचाराच्या घटना देखील दिवसेंदिवस समोर येत आहेत. बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैनिकांचा सैतानी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. बलुचिस्तानमध्ये घडलेल्या या चित्तथरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ बलूच फ्रीडम मूवमेंटचे कार्यकर्ते बीबग्र बलोच यांनी ट्विटरवर पोस्ट केला.

    या धक्कादायक व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती कोण आहे याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तरीही व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येते की त्या माणसाला पाकिस्तानी जवानांनी बेदम मारहाण करून एका ठिकाणी फरपटत आणले. तो माणूस दयेची भीक मागत होता. आपण कधीही मरणार या भीतीने त्याच्या तोंडून अल्लाह-अल्लाह एवढेच निघत होते. त्याचवेळी अचानक त्या सैनिकांपैकी एकाने त्या माणसावर बेछूट गोळीबार केला. एकाचवेळी जवळपास 12 गोळ्या झाडण्यात आल्या. पाकिस्तानी लष्कराकडून अशाच पद्धतीने बुलिचिस्तानमध्ये नागरिकांची हत्या केली जाते. फ्री बलूचिस्तान, बलूच नॅशनल मूवमेंट इत्यादी संघटना अशा घटनांचा तीव्र विरोध करतात.

Trending