Home | International | China | shocking video of woman trapped in parking carousel gets hit by car in china

मोबाईलच्या धुंदीत अशी रमली, कळलेच नाही की आपण जातोय तेथून बाहेरचा रस्ता नाहीच; शुद्धीवर आली तेव्हा समोर होती कार, मग...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 25, 2018, 12:03 AM IST

महिला नकळत ज्या लिफ्टमध्ये गेली ती प्रत्यक्षात एक कार लिफ्ट होती. आत प्रवेश केल्यानंतर तिला बाहेरचा रस्ताच नव्हता.

  • shocking video of woman trapped in parking carousel gets hit by car in china

    बीजिंग - मोबाईल फोनमध्ये व्यस्त असलेल्या एका महिलेच्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ प्रत्यक्षात 2017 मध्ये चीनच्या नानजिंग प्रांतातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये कैद झाला. सीसीटीव्हीत टिपलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला नकळत इमारतीवरून खाली येताना एका लिफ्टमध्ये गेली. परंतु, ती लिफ्ट माणसांसाठी नव्हे, तर कार पार्किंगसाठी होती. यानंतर जे काही घडले ते सर्व व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.


    व्हिडिओमध्ये असलेली एक महिला आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असताना दिसून येते. ती ज्या लिफ्टला सामान्य लिफ्ट समजून आत गेली, ती प्रत्यक्षात एक कार लिफ्ट होती. आत जाताच लिफ्ट बंद झाली आणि सोबतच बाहेर निघण्याचा दुसरा रस्ता सापडलाच नाही. यानंतर ती लिफ्ट अचानक खाली गेली. त्या ठिकाणी आधीच एक कार येण्यासाठी थांबली होती. लिफ्ट खाली जाताच ती कार लिफ्टमध्ये चढली. आतून त्या कारपासून वाचण्यासाठी महिलेला जागाच नव्हती. सर्व काही अचानक घडल्याने कारही त्या महिलेच्या अंगावर चढली. सुदैवाने या अपघातात तिला गंभीर दुखापत झाली नाही. तरीही मोबाईलमध्ये व्यस्त राहून चालणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ एक धडा ठरू शकतो.

Trending