आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामथुरा(उत्तर प्रदेश)- मथुरा जंक्शनवर सोमवारी एक भयंकर घटना घडली. एका वर्षाची चिमुकली स्टेशनवर लोकांचा धक्का लागल्यामुळे आईच्या हातातून निसटून रेल्वे ट्रॅकवर पडली. तेवढ्यात तेथे उभ्या असलेल्या रेल्वेने वेग घेतला. चिमुरडीचा जीव वाचावा म्हणून देवाकडे प्रार्थना करण्याशिवाय लोक काहीच करू शकत नव्हते. रेल्वे जात असताना चिमुरडी ट्रॅकमध्येच फसलेली होती. रेल्वे निघून गेली आणि सगळ्यांनी रुळाकडे धाव घेतली. एकच आरडाओरड सुरू झाली. चिमुरडीला सुखरूप पाहून सर्वांचा जीव भांड्यात पडला. सर्वच चकित झाले, कारण मुलीला जराही खरचटले नव्हते.
अशी घडली घटना
- ती मुलगी आणि तिचे आई-वडील प्लॅटफॉर्म-1 वरून समता एक्स्प्रेसने आग्र्याला जात होते. तेव्हा गर्दीत अचानक त्यांचे पाकीट कोणीतरी चोरले. त्या पाकिटात पैसे आणि ट्रेनचे तिकीट होते. त्यामुळे त्यांना ट्रेनमधून उतरावे लागले. ते पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी जाणार जेवढ्यात कोणाचा तरी धक्का त्या चिमुकलीच्या आईला लागला आणि मुलगी कडेवरून निसटून ऐन रेल्वे ट्रॅकमध्ये पडली.
- पडलेल्या मुलीला उचलण्याआधीच अचानक रेल्वे सुरू झाली. हे पाहून फलाटावरील सर्व जागीच थिजले. आईची तर शुद्धच हरपली. पण ट्रेन निघून गेली तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला, कारण मुलीला काहीही झालेले नव्हते. या चमत्कारिक घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.