Home | National | Other State | Shocking Video Viral Of A Student Of Shahjahanpur In Uttar Pradesh

सावधान! TIK TOKचा व्हिडिओ पडला महागात, तुरुंगाची हवा खातोय आता 'हीरो'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 06, 2019, 02:48 PM IST

लक्षात ठेवा! प्रसिद्धीसाठी काहीही करतेय तरुणाई, पण पोलिसांचीही असते करडी नजर

  • Shocking Video Viral Of A Student Of Shahjahanpur In Uttar Pradesh

    शाहजहांपूर, यूपी - TIK TOK या व्हिडिओ अॅपची देशभरात क्रेझ आहे. विशेषकरून तरुणाई यावर तऱ्हेतऱ्हेचे व्हिडिओ बनवून टाकत असते. मेट्रो शहरेच नव्हे तर अगदी खेड्यापाड्यांतूनही तरुणाई यावर आपले टॅलेंट दाखवण्यासाठी सरसावली आहे.

    परंतु याच टिकटॉकवर व्हिडिओ बनवणे एका बीकॉमच्या विद्यार्थ्याला महागात पडले आहे. वास्तविक, त्याने हीरोपंती दाखवत गावठी पिस्तूलांसह व्हिडिओ बनवून त्यावर टाकला आणि पाहता-पाहता तो सोशलवर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पोलिसांच्याही नजरेत आला. पोलिसांनी त्वरित अॅक्शन घेत या विद्यार्थ्याची घरी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. टिकटॉकवर पिस्तूलांचा व्हिडिओ टाकणारा हा हिरो आता तुरंगाची हवा खात आहे. तेव्हा टॅलेंट जरूर दाखवा, पण कायद्याचे भान राखूनच!

Trending