आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shoot Out At ITBP Camp In Chhattisgarh Kills 5, Injures 3 Soldiers News And Updates

सुटी मिळत नसल्याने नाराज आयटीबीपी जवानाचा कॅम्पमध्ये गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, 2 जखमी

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नारायणपूर - छत्तीसगडमध्ये तैनात इंडो-तिबेटियन सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) जवानाने नारायणपूर कॅम्पमध्ये आपल्याच सहकाऱ्यांवर बेछूट गोळीबार केला. यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संबंधित जवानाने स्वतःचे आयुष्य संपवले. काँस्टेबल मसूद-उल-रहमान असे त्या जवानाचे नाव असून तो मूळचा पश्चिम बंगालच्या नाडियाड जिल्ह्याचा रहिवासी होता. त्याने गोळीबारानंतर आत्महत्या केल्याच्या वृत्तास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

आयटीबीपीचे प्रवक्ते विवेक पांडे यांनी सांगितल्याप्रमाणे, "पाच जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या जवानाला उपचारासाठी नेले जात असताना रस्त्यातच जीव गेला. या गोळीबारात आयटीबीपीच्या 45 व्या बटालियनच्या 6 जवानांचा मृत्यू झाला आहे." मृतांमध्ये दोन हेड काँस्टेबल महेंद्र सिंग, दलजित सिंग आणि 5 काँस्टेबल मसूद-उल-रहमान, सुरजीत सरकार, बिस्वरूप महतू, बिजीश यांचा समावेश आहे. या गोळीबारात इतर काही जवान सुद्धा जखमी झाले. त्यांची नावे काँस्टेबल बी उल्हास आणि सिताराम दून अशी आहेत. त्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुटी मिळत नसल्याने मसूद नैराश्यात होता आणि त्यावरूनच झालेल्या वादानंतर त्याने हा गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. आयटीबीपीने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार केवळ मसूदने केला आणि स्वतः आत्महत्या केली. त्याला थांबवण्यासाठी कुठलीही क्रॉसफायरिंग झालेली नाही. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...