आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकारीचा आरोप : गोल्फर रंधावा, नेमबाज महेश बिराजदारला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- आंतरराष्ट्रीय गोल्फ खेळाडू ज्योती रंधावा व राष्ट्रीय नेमबाज महेश बिराजदार यांना यूपीच्या बहराइच येथील दुधवा संरक्षित व्याघ्र प्रकल्पात शिकार केल्याच्या आरोपात बुधवारी अटक झाली.

 

दोघे कटरनियाघाट मोतीपूर रेंजमध्ये शिकार करताना आढळले. त्यांच्याकडून ०.२२ बोअरची रायफल, ८० काडतुसे, डुक्कर-सांबराचे कातडे, जंगली कोंबडे व इतर साहित्य जप्त केले अाहे. दुधवा टायगर रिझर्व्हचे संचालक रमेश पांडेय म्हणाले, वन्यजीव संरक्षण कायद्याखाली गुन्हे दाखल करून दोघांना अटक केली. काेर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली. त्यांना ६ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.


अभिनेत्री चित्रांगदा सिंहचा पूर्वाश्रमीचा पती ज्योती रंधावा (४६) याने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या आहेत. २००४ ते २००९ दरम्यान तो जागतिक गोल्फ क्रमवारीत टॉप-१०० मध्ये होता. महेश बिराजदार मूळ महाराष्ट्राचा आहे. तो माजी नौदल कॅप्टन आहे. गैरव्यवहाराच्या अाराेपामुळे चार वर्षांपूर्वी त्याचे कोर्ट मार्शल झाले.

 

 

बातम्या आणखी आहेत...