आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूजर्सीमध्ये कब्रस्तान आणि सुपरमार्केटमध्ये गोळीबार, पोलिस अधिकाऱ्यासह 6 जणांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फायरिंगमध्ये मारले गेलेल्यांमध्ये 2 संशयीतांसह 3 स्थानिक नागरिकांचा समावेश

वॉशिंग्टन- अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये मंगळवारी बंदुकधारी आणि पोलिसांमध्ये चार तास गोळीबार झाला. या दरम्यान एक पोलिस अधिकारी, दोन संशयीतांसह 6 जणांचा मृत्यू झाला, तर इतर दोन पोलिस अधिकारी जखमी झाले. अमेरीकेत गोळीबाराच्या घटना सामान्य आहेत, 2017 मध्ये अंदाजे 40 हजार लोकांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे.पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, जर्सी सिटीमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी फायरिंग झाली. सर्वात आधी कब्रस्तानमध्ये गोळीबार झाला. पोलिसांनी कारमधून पळून जाणाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी डिटेक्टिव्ह जोसफ सील्सला गोळी मारली.  उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोर एका सुपरमार्केटमध्ये घुसले. यावेळी स्वॉटसह पोलिसांची इमर्जेंसी सर्विस यूनिट्सला तिथे पाठवण्यात आले. यावेळी पोलिस आणि हल्लेखोरांमध्ये चार तास चकमक सुरू होती.