आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Controversy: कंगना रनोटच्या ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’चे थांबले काम, हे आहे यामागचे मोठे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंगना रनाेटच्या मेगाबजेट 'मर्णिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' चित्रपटाचे पोस्ट प्राॅडक्शन काम सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या शेवटच्या भागाचे शूटिंग फिल्म सिटीमध्ये सुरू होते, मात्र तंत्रज्ञ आणि ज्युनियर आर्टिस्टला पगार दिला नसल्याने शूटिंग मध्येच थांबवण्यात आले होते. सूत्राच्या माहितीनुसार, तंत्रज्ञ संघटनेला जेव्हा कळले की, कनिष्ठ कलावंत आणि तंत्रज्ञ यांचे 1 ते 2 कोटी रुपये अजून दिले नाहीत, तेव्हा युनियनच्या सदस्यांनी तंत्रज्ञांना शूटिंग थांबवण्याचे आदेश दिले. तथापि, निर्मात्यांनी मानधन देण्याचे वचन दिले, मात्र अजूनही त्यांना पैसे मिळाले नाहीत. 


हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. निर्माते याला लवकरात लवकर पूर्ण करू इच्छित आहेत. टीम सध्या पोस्ट प्रॉडक्शनवर काम करत आहे. निर्माते कमल जैनसोबत कंगनादेखील प्रत्येक कामावर नजर ठेवून आहे. कंगनाशी जेव्हा या विषयावर चर्चा झाली तर ती म्हणाली, 'मी सध्या भोपाळमध्ये 'पंगा' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या विषयावर टीमसोबत चर्चा झाल्यानंतरच काही सांगू शकेन. आमच्या पूर्ण टीमने या चित्रपटावर खूप मेहनत घेतली आहे. जर तंत्रज्ञ आणि कनिष्ठ कलावंतांना पैसे मिळाले नसतील तर हे खूपच वाईट आहे.' 

 

निर्मात्यांच्या मते, आतापर्यंत महिलाकेंद्रित चित्रपटांपैकी हा सर्वात महाग चित्रपट आहे. या चित्रपटावर आतापर्यंत 125 कोटी रुपयांची गुंतवणूक केली गेली आहे. यासाठी कंगनाला 12-14 कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे. 


झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर आधारित हा चित्रपट यापूर्वीदेखील अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे. यापूर्वी मूळ दिग्दर्शक क्रिशच्या जागी कंगनाचे नाव दिग्दर्शक म्हणून समोर आले होते, तेव्हादेखील बरीच चर्चा झाली होती. नंतर कंगनाने सांगितले हाेते, यात मी दिग्दर्शक म्हणूनही काही काम पाहणार आहे. चित्रपटातील काही दृश्यांचे तिने दिग्दर्शन केले आहे. मात्र, टीमसोबत खटके उडल्यानंतर दिग्दर्शक सोडून गेला होता. त्यानंतर सोनू सूदनेही चित्रपट सोडला, त्या वेळी तो चर्चेत होता. 

बातम्या आणखी आहेत...