आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shootout I Mexico Between Soldiers And Mexican Drugs Cartels 15 People Killed In Guerrero

ड्रग्स तस्करांच्या गोळीबारात एका जवानासहित 15 जणांची हत्या, एक दिवसाआधीच 14 सैनिकांची हत्या झाली होती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅक्सिको सिटी- मॅक्सिकोच्या गुएरेरोच्या दक्षिण राज्यात मंगळवारी ड्रग्स तस्कर आणि सुरक्षादलामध्ये मोठी चकमक झाली. यात एका सैनिकासहित 15 जणांचा मृत्यू झाला आहे. स्टेट पब्लिक सिक्योरिटी अथॉरिटीचे प्रवक्ते रॉबर्टो अलवारेज हेरेदियाने ट्विटरवरुन याची माहिती दिली. दरम्यान, या चकमीक्चाय एक दिवस आधी म्हणजेच सोमवारी अगुलिल्ला शहरातही ड्रग्स तस्करांसोबत झालेल्या चकमकीत 14 पोलिस कर्मचारी शहीद झालेत.रॉबर्टो यांनी ट्वीट केले, "आज(मंगळवार) 911 वर फोन आला. व्यक्तीने सांगितले की, इगुआलापासून अंदाजे 5 किमी दूर एका व्यक्तीने गोळीबार केला. जिथे ही घटना झाली, तिथे तेपोचिका समाजातील लोक राहतात. तक्रार मिळताच घटनास्थळी सुरक्षादलाला पाठवण्यात आले." सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

दोषींवर कडक कारवाई केली जाईल- गव्हर्नर
 
14 पोलिस कर्माचाऱ्यांच्या हत्येप्रकरणी पश्चिम राज्य मिचोआकानचे गव्हर्नर सिलवानो ऑरियोलेस कोनेजो यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, जो कोणी सैनिक किंवा पोलिस कर्माचाऱ्यांवर हल्ला करेल, त्यांची दया केली जाणार नाही.