आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःच्या दातांमुळेच यांना झाला मोठा त्रास, 3 वर्षे हाताने जेवता आले नाही, बोलताही येत नव्हते.. तोंडातून गळायची लाळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - येथील एका व्यक्तीला असा प्रॉब्लेम झाला की, तीन वर्षे त्याला स्वतःच्या हाताने जेवताही येत नव्हते. बोलताही येत नव्हते. जोरात ओरडल्यानंतर त्याच्या गळ्यात वेदना व्हायच्या. पण हे सर्व झाले त्यांच्या दातांमुळे (आर्टिफिशियल दातांमुळे). पण तीन वर्षांनंतर तो व्यक्ती आता पूर्ण बरा झाला आहे. हा व्यक्ती आता त्याच्या हाताने जेवणही करू लागला आहे. पण नेमके काय झाले होते, हे आपण जाणून घेऊयात. 


नेमके काय झाले? 
- 46 वर्षांच्या दीपक नंदी यांनी आर्टिफिशयल दात लावलेले होते. एकदा चुकून त्यांनी दोन कृत्रिम दातच गिळले. तोंडाच्या खालच्या जबड्यातील हे दात होते. 
- या कृत्रिम दाताने दीपक यांच्या अन्ननलिकेला इजा झाली आणि हे दात त्यांच्या गळ्यात अटकले. त्यामुळे त्यांना काहीही खाताना किंवा पिताना त्रास होत होता. काही गिळताही येत नव्हते. 
- या सर्वामुळे त्यांच्या तोंडातून लाळही गळायला लागली होती. त्यामुळे ते बहुतांश काळ एकटे राहू लागले होते. 


लाजेपोटी कुटुंबीयांनाही सांगितले नाही 
- दीपक यांनी लाजेपोटी कुटुंबीयांनाबी याबाबत सांगितले नाही. पण त्यांनी जेव्हा कुटुंबीयांसमोर जेवण करण्यास नकार दिला त्यावेळी कुटुंबीयांनी काहीतरी आजार असल्याचा संशय आला. त्यानंतर दीपकवर उपचार सुरू झाले. 
- गेल्या दोन वर्षांपासून ते गळ्यात अडकलेल्या आर्टिफिशियल दांत काढण्यासाठी सर्जरी करत होते. अन्ननलिका डॅमेज झाल्याने त्यांना काहीही खाताही येत नव्हते. नळीच्या माध्यमातून अन्न त्यांच्या शरिरात पोहोचवले जात होते. 


अन्ननलिका झाली डॅमेज 
- डॉक्टरांनी दीपकला लगेच तज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर एक्सरे आणि एंडोस्कोपी केल्यानंतर दीपक यांना फिस्टुला नावाचा आजार झाल्याचे समोर आले. 
- सर्जरीनंतर लक्षात आले की, आर्टिफिशियल दातांमुळे दीपकची अन्ननलिका प्रंड डॅमेज झाली आहे. अन्ननलिकेला अनेक ठिकाणी छिद्र पडली आहेत. त्यामुळे त्यांनी नीट बोलताही येत नव्हते. 
- डॉक्टरांनी अनेक प्रयत्नांनंतर सर्जरी करून आर्टिफिशियल दात काढून अन्ननलिकेवर उपचार केले. त्यानंतर दीपकला आता व्यवस्थित खाता पिता येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...