आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवत 10 लाखांना गंडवले, ‘माय डायल’विरुद्ध गुुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डिजिटल इंडियाअंतर्गत देशभर जाहिरातीचे एलईडी लावायचे असून यात गुंतवणूक केल्यास दहा महिन्यांत दामदुप्पट मिळेल असे आमिष दाखवून सुमारे १० लाखांना गंडवल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी गुरुवारी औरंगाबादच्या माय डायल डिजिटल एलईडी अॅड प्रा.लि.च्या ७ संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.  यात ५०० गुंतवणूकदारांनी ४४०० आयडीद्वारे सुमारे १६ कोटींची गुंतवणूक केली असून त्यामुळे मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. 


जटवाड्याचे अमोल प्रकाश मावस यांनी पोलिस आयुक्तांकडे  ही तक्रार केली होती. त्यामुळे हा घोटाळा उघडकीस आला. कंपनीने फेब्रुवारी २०१८ पर्यंत परतावा दिला. परंतु नंतर वेबसाइट बंद करून परतावा बंद केला. या प्रकरणी कंपनीचे संचालक आकाश सरोदे, पुरुषोत्तम चचेरे,प्रणव बाला,अभिजित देव,योगेश टोपले, सचिन मेश्राम,अाकाश सरोदे या संचालकांविरुद्ध गुुन्हा दाखल करण्यात आला. २०१७ च्या डिसेंबरमध्ये या लोकांनी औरंगाबादेत  सेमिनार घेऊन गुंतणूकदारांना दुप्पट रकमेची योजना सांगितली. ठेवी स्वीकारल्यानंतर त्यांचे युजर आयडी तयार करण्यात येत होते.ते कंपनीच्या वेबसाइटवर दिसायचे व त्याचा परतावा बँक खात्यात थेट जमा होईल, असे सांगितले होते. अमोल प्रकाश मावस यांनी ऑगस्ट २०१७मध्ये पहिल्यांदा गुंतवणूक केली. नंतर दहा वेळा एकूण १० लाख एक हजार रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीला परतावा मिळाला. पण फेब्रुवारी २०१८ नंतर वेबसाइट व परतावाही बंद झाला. ही तक्रार मावस यांनी पोलिस आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार शुक्रवारी वेदांतनगर कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पो. नि. श्रीकांत नवले, सुभाष खंडागळे, गणेश  शिंदे, कारभारी गाडेकर तपास करत आहेत.

 

 

दहा महिन्यांत दामदुप्पट!  
- २१ हजार रुपये गुंतवणूक केल्यास ३७८० प्रमाणे १० महिन्यांत ३७,८०० रुपये परतावा 
- ४९ हजार रुपये गुंतवल्यास ८,८२० रु.प्रमाणे १० महिन्यांत ८८,२०० रुपये परतावा 
- त्याशिवाय प्रत्येकास जाहिरातीचा एक एलईडी भेट.

बातम्या आणखी आहेत...