आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राफेल, चिनूक, अपाचे, धनुष्य तोफांतून देशाच्या सामर्थ्याचे दर्शन, महिला टीम मोटारसायकलवर दाखवणार कसरती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या तयारीअंतर्गत राजपथावर गुरुवारी सैन्याचा शस्त्रसज्ज ताफा निघाला. - Divya Marathi
७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या तयारीअंतर्गत राजपथावर गुरुवारी सैन्याचा शस्त्रसज्ज ताफा निघाला.

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत गुरुवारी प्रजासत्ताकदिनी फुल ड्रेस रिहर्सल करण्यात आली. त्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी शस्त्रांसह कदमताल केले. यंदाच्या संचलनात धनुष १४५, एमएम-५२ कॅलिबर होवित्झर तोफ, अपाचे व चिनूक प्रमुख आकर्षण राहतील. सोबतच लढाऊ राफेलच्या देखाव्याचाही समावेश करण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त अँटी सॅटेलाइट वेपन सिस्टिमही पहिल्यांदा सादर केली जाणार आहे. हा भारताच्या शस्त्रागारातील सर्वात मोठे शस्त्र मानले जाते. भारताचे पहिले स्वदेशी अटॅक हेलिकॉप्टर एलसीएच देखील हवाई दलाच्या देखाव्यात दिसेल. त्याला आतापर्यंत हवाईदलात समाविष्ट करण्यात आलेले नाही. कोची शिपयार्डमध्ये तयार होत असलेले हे स्वदेशी बनावटीचे विमानवाहू युद्धनौका विक्रांत यंदा नौदलाच्या देखाव्यात समाविष्ट होईल. त्याचबरोबर अँटी सबमरीन व टोही विमान पी-८ आय देखील सामील करण्यात आले आहे. विशेष दलाचे कमांडोंचे पथसंचलन व सीआरपीएफ जवानांच्या थरारक कवायती पाहायला मिळतील.

एनडीआरएफचा ताफा सूट गिअरमध्ये

संचलनात एनडीआरएफचा ताफा सीबीआरएन (केमिकल बायोलॉजिक रेडिआेलॉजिकल व न्यूक्लिअर) सूट गिअरमध्ये दिसेल. त्याद्वारे नैसर्गिक आपत्ती, रासायनिक हल्ल्यांचा मुकाबला करण्याचे तंत्र दाखवतील. त्याशिवाय काश्मीर व अर्थ मंत्रालयाच्या वतीने देखावे पाहायला मिळतील.

  • 22 देखावे काढणार, १६ राज्ये, ६ विभागांचा समावेश
  • 90 मिनिटांचे असेल संचलन, १६ संचलनाचे पथक
  • 21 बँड परेडमध्ये सहभागी होतील. १३ चमू सैन्य बँडचे.
  • 44 राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मुलेही संचलनात होतील सहभागी

डेअरडेव्हिल्स : महिला टीम मोटारसायकलवर दाखवणार कसरती

देशातील महिला शक्ती यंदाच्या संचलनात चित्तथरारक कवायती सादर करतील. सीआरपीएफच्या डेअरडेव्हिल्स टीम पहिल्यांदा राजपथवर माेटारसायकलच्या साह्याने नऊ प्रकारच्या कवायती सादर करतील. या टीममधील अनेक महिला जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहेत. त्यापैकी काही ईशान्येकडील अनेक राज्यांत कायदा-सुव्यवस्थेवर निगराणी ठेवण्याचे काम करत आहेत. डेअरडेव्हिल्स टीममध्ये काही महिला नक्षली प्रभाव असलेल्या राज्यांत तैनात आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...