आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितृदोषाचे 7 संकेत, तुमच्यासोबतही घडत असतील या गोष्टी तर करा हे 4 उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या श्राद्ध पक्ष चालू असून हिंदू धर्मामध्ये श्राद्धाची प्रथा सुरु करण्यामागे प्रमुख हेतू असा आहे की, मनुष्याने वर्षभरातून एकदा आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांच्याबद्दल आपली श्रद्धा व्यक्त करावी. श्राद्धाचा अर्थ आपल्या पितरांसाठी व्यक्त करण्यात आलेली श्रद्धा. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल, त्यांच्यासाठीसुद्धा श्राद्ध पक्षाचा काळ विशेष आहे. कारण या सोळा दिवसांमध्ये करण्यात आलेल्या कर्मावरून पितृदोषातून मुक्ती मिळणे शक्य आहे. धर्म ग्रंथानुसार जे लोक श्राद्ध पक्षात आपल्या पितरांचे तर्पण, पिंडदान व श्राद्ध करत नाहीत त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामधील काही अडचणी खालीलप्रमाणे आहेत...


1.ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष असेल त्यांच्या घरात आपत्य होण्यामध्ये अडचणी येतात. अनेकदा आपत्य जन्मालाच येत नाही आणि आले तरी जास्त दिवस जिवंत राहत नाही.


2. पितृ दोषामुळे नेहमी धनाची कमतरता राहते. कोणत्या न कोणत्या रुपात नेहमी धनहानी होत राहते.


3. ज्या लोकांना पितृदोष असतो त्यांचे लग्न जमण्यात अडचणी येत राहतात. काही लोकांचे लग्न होतही नाही.


4. कुटुंबात एखाद्या व्यक्तीसोबत सतत वाद होत राहतात. घरात कलहाचे वातावरण निर्माण होते.


5. एखादा व्यक्ती कोर्ट प्रकरणात अडकला असेल किंवा कोणतेही कारण नसताना कोर्टाची पायरी चढावी लागली तर हे पितृदोषामुळे घडू शकते.


6. पितृदोषामुळे कुटुंबातील एखादा सदस्य वारंवार आजारी पडतो. हा आजार लवकर बरा होत नाही.


7. पितृदोषामुळे मुलीचे लग्न जमण्यात अडचणी निर्माण होतात. लग्नाला उशीर होतो किंवा मनासारखा वर मिळत नाही.

 

पितृदोषापासून दूर राहण्यासाठी श्राद्ध काळात करा हे उपाय
1. श्राद्धामध्ये ब्राह्मणाला जेवणासाठी आमंत्रित करावे किंवा भोजन सामग्री ज्यामध्ये पीठ, फळ, गूळ, साखर, भाजी आणि दक्षिण द्यावी.
2. विद्वान ब्राह्मणाला एक मूठभर काळे तीळ दिल्यानेही प्रसन्न होतात पितृगण.
3. श्राद्ध पक्षामध्ये पितरांचे स्मरण करून गायीला चारा खाऊ घालावा. यामुळेसुद्धा पितृ प्रसन्न होतात.
4. सूर्यदेवाला अर्घ्य देऊन प्रार्थना करावी की, तुम्ही माझ्या पितरांना श्रद्धायुक्त नमस्कार पोहोचवून त्यांना तृप्त करावे.


पुढील स्लाईड्सवर पाहा ग्राफिक्स प्रेझेंटेशन...

बातम्या आणखी आहेत...