आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धा कपूरने सोडले मौन, 'स्ट्रीट डान्सर 3डी' साठी सोडला होता सायना नेहवालचा बायोपिक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : श्रद्धाने पहिल्यांदाच सायना नेहवालचा बायोपिक सोडल्याचे कारण सांगितलेे. ती म्हणाली, इंडस्ट्रीत असे बरेच लोक आहेत, जे नेहमी माझ्यासाठी उभे राहतात आणि मी त्यांना नकार देऊ शकत नाही. त्या लोकांपैकी मोहित सुरी आणि रेमो डिझुजा आहेत. माझ्यासाठी हे लोक खूप महत्त्वाचे आहेत. रेमोने मला 'एबीसीडी 2'सारख्या चित्रपट दिला होता, त्यामुळे जेव्हा त्यांच्याकडून मला 'स्ट्रीट डान्सर 3डी'ची ऑफर आली तेव्हा त्याच्या तारखा आणि सायना बायोपिकच्या तारखा जुळत नव्हत्या. त्यामुळे मी रेमोचा चित्रपट निवडला. नाते आणि प्रोजेक्टमधून मी नाते निवडले, असे म्हणता येईल.

दोन्हींपैकी एक निवडायचे होते... 

श्रद्धा म्हणाली, "हे दोघे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. रेमो सरांनी मला 'एबीसीडी 2' सारखा चित्रपट दिला, त्यामुळे जेव्हा त्यांच्याकडून 'स्ट्रीट डान्सर 3डी' ची ऑफर आली तेच तारखा सायना नेहवालच्या बायोपिकसोबत क्लॅश होत होत्या. अशात मला दोन्हींपैकी एक निवडायचे होते, रिलेशनशिप किंवा एक प्रोजेक्ट."

डान्समध्ये झाला ट्रेनिंगचा फायदा... 

श्रद्धा पुढे म्हणाली, मी नात्याला जास्त महत्व दिले, त्यामुळे मला कुणीही जज करून शकत नाही, पण मी अशीच आहे. मात्र बायोपिक सोडणे मलाही चांगले वाटले नव्हते. जी ट्रेनिंग मी घेतली होती त्याचा फायदाच झाला. मी जास्त फिट बनले आणि स्ट्रीट डान्सर 3डी मध्ये डान्समधील अवघड मुव्ह्ज करतं मला सोपे गेले. 

बातम्या आणखी आहेत...