Magazine / मानसिकता कधी बदलणार?

तुम्ही तुमची मानसिकता बदलली तरचं हे जग चांगल्या रीतीने व चांगल्या पद्धतीने ओळखले जाईल।
 

श्रद्धा देशपांडे

Jul 09,2019 12:04:00 AM IST

‘मानसिकता’ हा एक असा विषय आहे, जो कधीच बदलू शकत नाही. कारण लोक स्वतःची mentality change करू इच्छित नाहीत. आणि स्वत: मध्ये किंचितही बदल न करता, आपला देश सुरक्षित देश असावा असं यांना वाटत असतं. कसं शक्य आहे हे?

आता सांगायचं झालं तर खूप गोष्टी आहे, ज्या जुन्या काळापासून लोकांनी प्रथा म्हणून थोपवून ठेवल्या आहेत. त्याचनुसार ह्या जीवनात आपण चालले पाहिजे, ज्याने आपले जीवन सुरळीत चालेल. जशा जुन्या चालीरीती तेव्हाचे लोक मन लावून न चुकता पार पडायचे, तसे आत्ताही सुशिक्षित लोक त्या चालरीती पार पाडत आहे. तेव्हा च्या काळात लोक शिक्षित नव्हते, म्हणून त्यांना बाकीच्या *फालतू* गोष्टींमध्ये खूप रस होता, खास करून, अंधश्रद्धा व बाकी अजून गोष्टी ज्या मी आज तुम्हाला सविस्तर सांगणार आहे.


एखादा साधू किंवा बाबाने काही करायला सांगितले, तर लोक लगेच काहीही विचार न करता त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे करायला मोकळे होणार, अरे थोडा तरी खोलवर विचार करा, की बाबा अमुक केल्याने तमुक होईल, अरे बाबा जर असे चमत्कार झाले असते तर आपले जग सगळ्या गोष्टींपासून सुरक्षित राहिले नसते का? देवाने डोकं दिलेले आहे तर त्याचा चांगल्या ठिकाणी उपयोग करायला नको का? किमान जगातल्या व किमान भारतातल्या सर्व मुली सुरक्षित राहिल्या असत्या, तुंही ज्या पण गोष्टी त्या काळापासून चालत येत आहेत, त्या प्रथा जर नाही लादल्या तर चांगले होईल नाही का?


आजचं मी समाज माध्यमावर मी एक छायाचित्र पाहिले. ते माझ्या मोठ्या बहिणीने पोस्ट केलेले होते, ज्याला पटेल त्यांनी नक्कीच ह्यावर विचार करायला हवा, मलासुद्धा 1000% ती पोस्ट पटली, त्या चित्रात मधे असें दाखवले होते की ‘एक आई आपल्या बाळाला ब्रेस्ट फीडिंग करत आहे, आणि त्यावर माझ्या बहिणीचा व्यक्तव्य असं होता की, ‘ यही से पीकर बडे हुये है, फिर भी बडे होके इसीको ही क्यू घुरते है? खरं आहे. ज्या प्रकारे वाईट नजरेने हे माणसं आपल्या शरीराकडे बघत असतात, असा मला वाटत तिथेच देवाने त्याचे डोळे काढून त्याला आंधळं केलं असतं तर बरं होईल. असा संताप येतो, लोकांची मेंटॅलिटी पाहून. ही मेंटॅलिटी बदलू शकत नाहीत? मी तर हाच विचार नेहमी करते, की जी माणसं अश्या वाईट प्रकारे बायकांच्या व मुलींच्या शरीराकडे बघत असतात, त्यांचा जन्म आईच्या उदरातून झाला नाही का? त्यांनी आईचे दूध कधी प्यायलेले नाही का? मग आमच्याकडे बघत असताना हा विचार मनात येत नाही का? तुमच्या घरातसुद्धा बायका मुली आहेत, असा कधी विचार नाही केला, की त्यांना सुद्धा कोणीतरी असं बघतचं असेल, तुम्ही का म्हणून बायकांना व मुलींना एक भोगवस्तू म्हणून बघतात, त्याचप्रमाणे मासिक पाळी व मुलींनी काय घालावे काय घालू नये, यावरची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.


परवा असेचं इन्स्टाग्राम पहात बसले होते. तेवढ्यात एका ठिकाणी मला अशी मेंटॅलिटी असलेली बाई असं बोलतांना दिसली की, मुली लहान कपडे घालतात म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतात, आता असं हे वक्तव्य त्या बाईने बोलून दाखवले, आता मला सांगा, लहान कपडे घातल्याने कधी बलात्कार होतात का? इथे चूक कपड्यांची नाही, रेपिस्टच्या मेंटॅलिटीची आहे, तो का म्हणून तिने कपडे लहान घातले तर तिच्याकडे बघतो, अरे तुम्ही असे म्हणता हॉस्पिटलमध्ये सहा महिन्यांच्या बाळावरसुद्धा बलात्कार करतात, त्या बाळाने काय लहान कपडे घातले होते तर त्याच्यावर बलात्कार झाला, आजकाल पूर्ण कपडे घालणाऱ्यावर पण लोकांची वाईट नजर असते, त्या बाईने चक्क स्वतःची प्रतिमा जगासमोर खराब करवून घेतली, अरे रेपिस्टची आधी बघण्याची आणि विचार करण्याची वृत्ती बदलली ना तर असे प्रकार भारताच्या कानाकोपऱ्यात कुठेच घडणार नाही व आपल्या देशाच्या मुली सुरक्षितरीत्या आपला जीवन जगू शकतात.


परवा एक ATM वर एक माणूस चक्क त्याचं खासगी अंग काढून दाखवत होता, अरे निर्लज्ज माणसा, नशीब समज तू भारतात जन्मला, जर तू भारताच्या बाहेर जन्मला असतास तर तुला जिवंत जाळले असते. बाहेरच्या देशांत जसे कडक नियम काढले आहेत, जसे की कोणी काहीही कृत्य केलं तर त्याला तिथेच कडक शिक्षा मिळते, त्याला सोडण्यात येत नाही आणि भारतात असे नियम नसल्यामुळे लोक कसेही वागतात व कसे ही कृत्य करून स्वतःची प्रतिमा तर खराब करतातच पण त्याचसोबत स्वतःच्या फॅमिलीची पण प्रतिमा करतात, अरे तुमच्या घरातसुद्धा बायको मुली आहेत, तू रोज त्यांच्या समोर असा उभा राहतोस का? मग तू पब्लिक प्लेसमध्ये असा उभा कसं काय राहू शकतोस?अशावर तर मी म्हणेन कडक कारवाई करण्यापेक्षा तिथेच तिच्यासमोर कडक शिक्षा करायला हवी, जिच्यासमोर त्याने हे सगळं केलं आहे, मला ह्या गोष्टीचा जास्त अभिमान आहे की, त्या मुलीने लगेच मोबाइल काढून त्याचा व्हिडिओ बनवून पोलिसांना दाखवला व त्याला तिथल्या तिथेच अटक करण्यात आली. पण मला एक गोष्ट नाही कळली की जर तुला इतकाच इंटरेस्ट आहे दाखवायचा तर मग ती मुलगी व्हिडिओ काढत आहे तर तू लपतोस कशाला, दाखव ना सगळ्या जगाला तू काय करत होतास ते, मुलीला एकटं बघून हे असले चाळे करण्यापेक्षा तिला हेल्प करा, तिचे सुरक्षा कवच बना, तिला वेळप्रसंगी मदत करा, तुम्ही इकडे देवीला पूजता, तर मग तुम्ही ज्या प्रत्यक्ष आजूबाजूला वावरणाऱ्या मुलींची देवीप्रमाणे का नाही पूजा करू शकत, तिला आदर का नाही देऊ शकत, तिला वाईट नजरेपासून का नाही वाचवू शकत? बरं तो काही अशिक्षित माणूस होता असंही नाही. चांगल्या घरातला होता, त्याच्याकडून अशी अपेक्षा कोणी करणार नाही, कोणाला पण असंच वाटेल की तो शिक्षित माणूस दिसतो, तो असा वागणार नाही, पण आपलं गणितच नेहमीप्रमाणे चुकून जाते.


माझ्यासोबत पण असा एक प्रसंग घडला होता, तो मी तुम्हाला सांगू इच्छिते. मी आणि माझी मैत्रीण ड्रेस डिझायनिंगच्या क्लासला सोबत जायचो, तो आमचा नेहमीचा आणि ओळखीचा रस्ता असायचा म्हणून कधी असं वाटलं नाही की असं काही इथे पण घडू शकत, एकदा असेच माझ्या व माझ्या मैत्रिणीचे काही छोट्या कारणावरून भांडण झालं होतं, म्हणून आम्ही क्लासला वेगवेगळ्या वेळेला गेलो, आमचा क्लास सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत चालायचा, मी जातानासुद्धा एकटे आणि येतानासुद्धा एकटे चालत यायचे, नेमका त्या दिवशी माझी मैत्रीण माझ्याआधी 1 तास आधीच क्लासवरून घरी गेली होती व मी नेहमीप्रमाणे 1 वाजता घरी निघाले, रस्त्यावर शुकशुकाट असल्याने बाहेर कोणी जास्त लोक फिरत नव्हते, मी अशीच त्या रस्त्याने घरी निघाले असता, एक चांगल्या घरातला माणूस तिथे रस्त्याच्या मधोमध उभा होता, मला वाटले उभा असेल वाट बघत कोणाची तरी किंवा बसला असेल फोन काढून उभा असेल बोलत आणि तो काळ असा होता की तेव्हा माझ्याकडे स्मार्टफोनसुद्धा नव्हता की मी त्याचा व्हिडिओ काढून पोलिसांना देऊ, मी जात असताना नकळत माझा लक्ष त्याच्याकडे गेलं आणि बघते तर काय तो माणूस ज्याला मी चांगल्या घरातला समजत होते, तो मोटारसायकलवर बसून त्याचं खासगी अंग मुलींना दाखवत बसला होता. मला ते बघून अक्षरशः थरकाप उडाला, अरे हा माणूस सार्वजनिक ठिकाणी उभा राहून असले चाळे करतोय आणि घरातून लोक चक्क त्याची गंमत बघत आहेत, अरे एखादा उठला असता व त्याला पोलिसांच्या हवाली केलं असतं, पण नाही कोणाची हिंमतच नाही झाली आणि नुसतं बघत बसले, मी असं दाखवलं की माझा लक्षच नाही आहे. मी लवकर लवकर निघून गेले, पण त्याने मला परत पुढच्या रस्त्यावर गाठले आणि परत तेच चाळे करू लागला, मला तेव्हा जास्त कळत नव्हतं, पण आता कळत आहे तर तो माणूस एकदा पण समोर नाही आला आणि अशा सुशिक्षित एरियामध्ये असे प्रकार घडूच कसे देतात हे लोक, समाजाने पण विचार करायला हवा की नाही आज दुसऱ्याच्या मुलीसोबत होत आहे उद्या तुमच्या मुलीसोबत असं कोणी केलं तर, बर पण मी जेव्हा घरी आले तर भांडण तंटा विसरून मी तिच्याकडे काही कामानिमित्त गेले असता, तिनेसुद्धा तेच सांगितलं जे माझ्यासोबत घडलं होता, ती म्हणत होती मी जशी जशी घरी पोहोचत होते तसा तसा तो वळून वळून माझ्याच समोर येऊन उभा राहत होता, व तसं करत होता, मग घरी पोहोचल्यावर आई-वडिलांना सांगायला जात होतो तोपर्यंत तो गायब होऊन गेलेला असायचा.


मी फक्त देवाकडे एवढंच मागते की, जगातल्या सगळ्या मुली व बायका सुरक्षित राहो व कणखर बनो, कारण त्याची आता जास्त गरज आहे, जर माझ्याकडे फोन असता तर मी त्याचा तिथेच नायनाट केला असता। जे लोक गप्प बसतात ते जर खाली येऊन हेल्प करून गेले असते तर तो माणूस परत कुठे दिसला नसता, मुली व बायका काही प्रॉब्लेम मध्ये असतील तर प्लीज त्यांना मदत करा, त्यांना त्रास देऊ नका, कारण त्या पण कोणाच्या तरी आई आणि बहिणी आहेत।


तुम्ही तुमची मानसिकता बदलली तरचं हे जग चांगल्या रीतीने व चांगल्या पद्धतीने ओळखले जाईल।

X
COMMENT