Home | Reviews | Movie Review | Shraddha Kapoor And Rajkumar Rao Starrer Stree Movie Review

Movie Review:'ओ स्त्री कल आना' असे मजेदार डायलॉग्स, फुल टू कॉमेडी आहे 'स्त्री'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 31, 2018, 06:23 PM IST

चित्रपटाची कथा मध्य प्रदेशाच्या चंदेरी येथील आहे. येथे विक्की (राजकुमार राव) एक लोकल टेलर आहे.

 • Shraddha Kapoor And Rajkumar Rao Starrer Stree Movie Review
  • Genre: हॉरर कॉमेडी ड्रामा
  • Director: अमर कौशिक
  • Plot: डायरेक्टर अमर कौशिक ने 'स्त्री' चित्रपटातून डायरेक्शनमध्ये डेब्यू केला आहे.
  क्रिटिक रेटिंग 3.5/5
  स्टार कास्ट राजकुमार राव, श्रद्धा कपूर, अपारशक्ति खुराना, पंकज त्रिपाठी, अभिषेक बनर्जी
  डायरेक्टर अमर कौशिक
  प्रोड्यूसर दिनेश विजन, डीके
  जोनर हॉरर कॉमेडी ड्रामा
  ड्यूरेशन 127 मिनिटे

  'स्त्री'ची कथा : चित्रपटाची कथा मध्य प्रदेशाच्या चंदेरी येथील आहे. येथे विक्की (राजकुमार

  राव) एक लोकल टेलर आहे. आपल्या कामात एक्सपर्ट असलेला विक्की महिलांचे माप न घेताच त्यांना फक्त पाहूनच त्यांच्या साइजचे कपडे शिवतो. यामुळेच त्याला चेंदेरीचा मनीष मल्होत्रा असेल म्हटले जाते. विक्कीसोबतच चंदेरीमध्ये स्त्री नावाची एक भुतनी प्रसिध्द आहे. गावातील लोक स्त्रीपासून वाचण्याचा मार्ग शोधत असतात आणि आपल्या घराबाहेर वटवाघूळ आणि गोमूत्राची शाई बनवून- 'ओ स्त्री कल आना' असे लिहितात. येथे प्रत्येक वर्षी गावात चार दिवसांचे पूजा फेस्टिव्हल असते. विक्की हा आपला मित्र बिट्टू(अपारशक्ति खुराना) आणि जना (अभिषेक बनर्जी)सोबत राहतो. यावेळी विक्कीची भेट श्रध्दा कपूरसोबत होते. ती फक्त पूजेच्या रात्रीच गावात राहते. या चार रात्रींमध्ये गावात स्त्रीचा कहर वाढतो अशावेळी त्याचे मित्र विक्कीला सांगतात की, तुझी गर्लफ्रेंड भूत आहे. तेव्हाच चंदेरी येथे राहणारा रुद्र (पंकज त्रिपाठी) या मित्रांना चंदेरी पुराणाच्या माध्यमातून स्त्री आणि त्यामागची सत्यता सांगतो. आता श्रध्दा कपूरच स्त्री आहे का? स्त्रीचे रहस्य काय आहे? यासोबतच विक्की आपल्या मित्रांना आणि गावातील लोकांना स्त्रीच्या कहरापासून कसा वाचवतो. या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला चित्रपटात मिळतील.

 • Shraddha Kapoor And Rajkumar Rao Starrer Stree Movie Review

  'स्त्री'चा रिव्ह्यू 
  हॉररसोबतच कॉमेडी मिक्चर देणे सोपे नव्हते. अमर कौशिकला हे उत्तम जमले आहे. याचे थोडे क्रेडिच रायटर राज आणि डीकेलाही जाते. यासोबतच सुमित रॉयने चित्रपटाच्या माध्यमातून खुप फनी डायलॉग्स लिहिले आहे आणि स्टारकास्टने हे शानदार पध्दतीने रिप्रेझेंट केले आहे. चित्रपटात काही क्लासिक सीन्सही आहेत, यामध्ये एक सीन पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुरानामध्ये तर दूसरा विक्की आणि त्याच्या वडिलांवर चित्रित करण्यात आला आहे. फर्स्ट हाफ हा फुल टू कॉमेडी आहे. सेकंड हाफमध्ये चित्रपटाची एनर्जी लेव्हल डाउन होते आणि मध्ये-मध्ये चित्रपट डिसअपॉइंट करतो. राज कुमार रावने नेहमी प्रमाणे चित्रपटात उत्तम अभियन केला आहे. तो विक्कीच्या कॅरेक्टरमध्ये पुर्णपणे सामिल झाला आहे. पंकज त्रिपाठीने रुद्रच्या पात्राला न्याय दिला आहे. रुद्र चित्रपटात एका बुक शॉपकीपर आणि हाफ भूत एक्सपर्टच्या भूमिकेत आहे. तर मित्र बनलेल्या अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जीने राजकुमार रावला शानदार सपोर्ट केला आहे. श्रध्दा कपूर चित्रपटात सुंदर दिसली आहे. चित्रपटात बॅकग्राउंड स्कोर देणारे केतन सोधा आणि एडिटिंग करणा-या हेमंत सरकारनेही उत्तम काम केले आहे. यामुळे तुम्ही स्त्री चित्रपट एकदा पाहू शकता. 

 • Shraddha Kapoor And Rajkumar Rao Starrer Stree Movie Review

Trending