आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shraddha Kapoor Injured On Neck, Shoulder And Now Leg For The Third Time On The Set Of 'Street Dancer 3D'

'स्ट्रीट डान्सर 3D' चित्रपटाच्या सेटवर तिसऱ्यांदा जखमी झाली श्रद्धा कपूर, मान, खांदा आणि टाचेला झाली जखम 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : श्रद्धा कपूर आणि वरुण धवनचा आगामी डान्स बेस्ड चित्रपट 'स्ट्रीट डान्सर 3D' चे शूटिंग सुरु आहे. याचदरम्यान चित्रपटाच्या सेटवर श्रद्धा कपूर तिसऱ्यांदा जखमी झाली आहे. यापूर्वीही तिला मान आणि खांद्याला इजा झाली होती. पायाच्या टाचेला झालेल्या जखमेचा व्हिडीओ श्रद्धाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे.  

 

वरुणसोबत चित्रपटात दिसणार आहे... 
'स्ट्रीट डान्सर 3D' मध्ये वरुण धवनदेखील मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे डायरेक्शन रेमो डिसूजा करत आहे. टीमने जूनमध्ये चित्रपटाचे दुबई शेड्यूल पूर्ण केले. ज्याचे फोटोजदेखील श्रद्धाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. श्रद्धा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सतत चित्रपटाच्या सेटवरील अनेक व्हिडीओज आणि फोटो शेअर करते. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Little time pass is allowed @sushantkhatri148 #SD3 💖

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

 

 

चित्रपट पुढच्यावर्षी होणार आहे रिलीज... 
श्रद्धा-वरुणचा हा चित्रपट पुढच्यावर्षी 24 जानेवारीला रिलीज होणार आहे. बातम्यांनुसार, श्रद्धा पाकिस्तानची एक डान्सर म्हणून दिसणार आहे. तर वरुण पंजाबचा डान्सर असेल. यापूर्वी कतरिना कैफ चित्रपटात लीड रोल करणार होती. मात्र कतरिनाला चित्रपटापासून दूर व्हावे लागले कारण ती 'भारत' च्या शूटिंगमध्ये व्यस्त होती.