आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायना नेहवालच्या बायोपिकची शूटिंग सुरु, ट्रॅक सूट आणि गालावर तिळ लावून दिसली श्रध्दा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: अभिनेत्री श्रध्दा कपूरने बॅडमिंटन प्लेअर सायना नेहवालवर आधारित चित्रपटाची शूटिंग सुरु केली आहे. डायरेक्टर अमोल गुप्ते आणि प्रोड्यूसर भूषण कुमारसोबत चित्रपटाचा क्लॅप बोर्ड पकडून श्रध्दाने एक फोटो इंस्टाग्राम स्टोरीवज शेअर केला होता. तर शूटिंग दरम्यान श्रध्दा, साइनाचे वडील डॉ. रवीन सिंह आणि आई उषासोबत दिसली.


श्रध्दाने मागितल्या शुभेच्छा 
चित्रपटाच्या शूटिंगविषयी श्रध्दा म्हणाली - आम्ही शूटिंग सुरु करत आहोत. हा नवीन प्रवास सुरु करण्यासाठी खुप रोमांचित आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा हव्या आहेत. श्रध्दा शूटिंग स्पॉटवर साइनाप्रमाणे दिसतेय. तिच्या गालावर सायनाप्रमाणे तिळही दिसतोय.

 

डायरेक्टरचे लेटरही 
श्रध्दाने डायरेक्टर अमोल गुप्ते यांनी लिहिलेले एक लेटर शेअर केले आहे. यामध्ये लिहिलेय की- आमची प्रिय मुलगी श्रध्दा, साईंचे स्मरण करत आम्ही तुझे नाव साइना ठेवतोय. हा प्रवास सर्वांसाठी आठवणींचा ठरावा. बेटा आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. 

 

श्रध्दाने घेतली स्पेशल ट्रेनिंग 
साइनाच्या भूमिकेची तयारी करण्यासाठी श्रध्दाने बॅडमिंटन कोच पुलेला गोपीचंद आणि प्रवीण नायर यांच्याकडून स्पेशल ट्रेनिंग घेतली. स्वतः साइनानेही श्रध्दाला आपल्या प्रमाणे मूव्हमेंट शिकवले आणि अनेक दिवस ट्रेंड केले. जेव्हा तिला विश्वास बसला की, श्रध्दा आता सर्व काही शिकली आहे तेव्हाच शूटिंग सुरु करण्यात आली. 

 

यामुळे झाला उशीर 
सायनाला आपल्या बायोपिकमध्ये परफेक्शन हवे आहे. यामुळे तिने अमोल गुप्तेंना सांगितले होते की, जोपर्यंत श्रध्दा तिच्याप्रमाणे खेळत नाही, तोपर्यंत चित्रपटाची शूटिंग सुरु करु नका. श्रध्दाला चांगले बॅडमिंटन शिकवण्यासाठी खुप मेहनत लागली. तिला अनेक वेळा जखमाही झाल्या आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...