आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धा कपूरला टायगरने दिले सरप्राइज, अचानक फॅन्ससोबत पोहोचून 'बागी 3'च्या गाण्यांवर धरला ताल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री श्रद्धा कपूरने 3 मार्च रोजी आपला 33 वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने चाहत्यांनी तिच्यासोबत डान्सर करुन तिला सरप्राइज दिले. खास गोष्ट म्हणजे चाहत्यांच्या डान्सनंतर टायगरने श्रद्धाच्या मागून एन्ट्री घेत तिला आश्चर्याचा मोठा धक्का दिला. 'बागी 3' मधील दस बहाने करके ले गई दिल या गाण्यावर टायगरने डान्स केला. श्रद्धा-टायगरचा हा चित्रपट 6 मार्च रोजी रिलीज होत आहे.

'बागी 3' मध्ये झळकणार एकत्र

टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरचा 'बागी 3' हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. 6 मार्च रोजी प्रदर्शित होत असलेला हा चित्रपट बागी सीरिजचा तिसरा चित्रपट आहे. दिग्दर्शन अहमद खान यांनी केले आहेत. या चित्रपटात रितेश देशमुख आणि अंकिता लोखंडे देखील दिसणार आहेत.