आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्राद्ध करताना लक्षात ठेवा या 15 गोष्टी, अन्यथा क्रोधीत पितृ देऊ शकतात श्राप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म ग्रंथानुसार भाद्रपद मासातील पौर्णिमा तिथीपासून अश्विन मासातील अमावसेपर्यंत श्राद्ध पक्ष असतो. यावेळी श्राद्धपक्ष 25 सप्टेंबर, मंगळवारपासून सुरु होत असून 9 ऑक्टोबर, मंगळवारपर्यंत राहील. श्राद्ध पक्षामध्ये लोक आपल्या पितरांच्या मृत्यू तिथीला श्राद्ध करतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार श्राद्ध करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे, अन्यथा पितरांचा आशीर्वाद प्राप्त होत नाही. येथे जाणून घ्या, कोणत्या आहेत या गोष्टी...


1. श्राद्धामध्ये ब्राह्मणांना अन्नदान करणे आवश्यक आहे. जो व्यक्ती ब्राह्मणांना आमंत्रित न करता श्राद्ध कर्म करतो, त्याच्या घरात पितर जेवण करत नाहीत आणि शाप देऊन परत जातात. ब्राह्मणहीन श्राद्धाने मनुष्य महापापी होतो.


2. श्राद्ध कर्मामध्ये गायीचे दुध, तूप, दह्याचा उपयोग करावा. हे लक्षात ठेवावे की, गाईला वासरू होऊन दहा दिवस झालेले असावेत. गाईने वासराला जन्म देऊन दहा दिवस झाले नसतील तर त्या दुधाचा श्राद्ध कर्मात उपयोग करू नये.


3. जे पितर शस्त्राने मृत्यूला प्राप्त झाले असतील त्यांचे श्राद्ध मुख्य तिथीव्यतिरिक्त चतुर्दशीलासुद्धा करावे. यामुळे ते प्रसन्न होतात. श्राद्ध गुप्त पद्धतीने करावे.


4. श्राद्धामध्ये जवस, मटार आणि मोहरीचा उपयोग श्रेष्ठ राहतो. तिळाचे प्रमाण जास्त असल्यास श्राद्ध अक्षय होते. वास्तवामध्ये तीळ पिशाचांपासून श्राद्धाचे रक्षण करतात.


5. दुसऱ्यांच्या जागेत श्राद्ध करू नये. वन, पर्वत, पुण्यातीर्थ आणि मंदिर दुसऱ्याची जागा मानली जात नाही, कारण यावर कोणचीही मालकी नसते. यामुळे अशा ठिकाणांवर श्राद्ध केले जाऊ शकते.


6. जो व्यक्ती एखाद्या कारणामुळे नगरात राहणाऱ्या बहिणीला, तिच्या नवऱ्याला, मुलाला श्राद्धाचे जेवण करण्यासाठी आमंत्रित करत नाही, त्याच्या घरात पितरांसोबतच देवता अन्न ग्रहण करत नाहीत.


7. श्राद्ध करतना एखादा भिकारी दारामध्ये आला तर त्याला आदरपूर्वक जेवण वाढावे. जो व्यक्ती अशावेळी घरी आलेल्या याचकाला पळवून लावतो त्याचे श्राद्ध कर्म पूर्ण मानले जात नाही आणि त्याचे फळही नष्ट होते.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, श्राद्धाशी संबंधित इतर आठ गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...