आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंडदानासाठी प्रसिद्ध आहे उज्जैनचे हे तीर्थस्थळ, ग्रंथांमध्येही आहे याचे वर्णन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

16 दिवस चालणाऱ्या श्राद्ध पक्षामध्ये लोक आपल्या घरामध्ये श्राद्ध कर्म करतात आणि त्याचबरोबर पवित्र तीर्थ स्थळांवर पितरांच्या आत्मा शांतीसाठी तर्पण, पिंडदानही करतात. आपल्या देशामध्ये अनेक तीर्थ स्थळ पिंडदान, तर्पण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यामधीलच एक ठिकाण उज्जैन येथील सिद्धनाथ तीर्थ आहे. यालाच प्रेतशीला तीर्थ असेही म्हणतात. येथे दूरदूरवरून लोक आपल्या पितरांचे तर्पण करण्यासाठी येतात. तीर्थ पुरोहित पंडा समितीचे अध्यक्ष पं. राजेश त्रिवेदी यांच्यानुसार येथे जवळपास 150 कुटुंबाशी संबंधित 700 पुजारी तर्पण, श्राद्ध इ. कर्म करतात.


क्षिप्रा नदीच्या काठावर आहे हे स्थान 
सिद्धनाथ तीर्थ उज्जैनच्या भैरवगढ क्षेत्रामध्ये आहे. क्षिप्रा नदीच्या काठावर असल्यामुळे याचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. या ठिकाणी एक खूप मोठे वडाचे झाड आहे. याला सिद्धवट असे म्हटले जाते. प्रयाग आणि गया येथे ज्याप्रमाणे अक्षयवटचे महत्त्व आहे त्याचप्रमाणे उज्जैनचे सिद्धवट आहे. मान्यतेनुसार हे झाड स्वतः देवी पार्वतीने लावले आहे. धर्म ग्रंथानुसार याच ठिकाणी महादेवाचे पुत्र कार्तिकेय यांची मुंज झाली होती. स्कंद पुराणातील अवंतिका खंडात या तीर्थाचे वर्णन आढळून येते.


मुघलांनी कापले होते हे झाड
येथील शिलालेखानुसार, मुघलांनी हे तीर्थस्थळ नष्ट करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांना यामध्ये यश प्राप्त झाले नाही. मुघल शासकांनी हे झाड कापून त्यावर लोखंडाचे तवे ठोकले परंतु वटवृक्ष त्या लोखंडाच्या तव्यांना फोडून पुन्हा हिरवेगार बहरले.

बातम्या आणखी आहेत...