आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंडदान करताना बोटात का घालावा दर्फ/पवित्रक? आपल्याला माहिती आहे का या परमपरेचे कारण?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्क - हिंदू धर्माच्या प्रत्येक त्यौहारात काही ना काही परमपरा जुळलेल्या आहेत. या परमपरांमागे धार्मिक, वैज्ञानिक किंवा तार्किक पक्ष असतात. अशाच प्रकारच्या काही परमपरा श्राद्ध पक्षाशी संबंधित आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पंडित मनीष शर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे, श्राद्ध पक्ष 16 दिवसांचा असतो. यात हिंदू धर्माचे लोक आपल्या पितृांचे स्मरण करतात. तसेच त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान इत्यादी करतात. श्राद्ध पक्षाशी संबंधित काही परमपरा आणि त्यांचे प्रकार असे आहेत...


परंपरा 1. श्राद्ध करताना अनामिका बोटात पवित्रकाची अंगठी का घालतात?
उत्तर -
हिंदू धर्मात दर्फ/पवित्रक (एका विशिष्ठ प्रकारचे गवत) अतिशय पवित्र मानले जाते. अनेक कार्यांमध्ये दर्फाचा वापर केला जातो. श्राद्ध करताना दर्फाची अंगठी अनामिका बोटात धारण करण्याची परमपरा आहे. दर्फाच्या अग्रभागात ब्रह्मा, मध्य भागात विष्णू आणि मूळ भागात भगवान महादेव शंकर निवास करतात.

- श्राद्ध कर्मात पवित्रकाची अंगठी धारण करण्याचा अभिप्राय असा की आम्ही पवित्र होऊन पित्रांच्या शांतीसाठी श्राद्ध कर्म आणि पिंडदान केले आहे. महाभारताच्या एका प्रसंगानुसार, जेव्हा गरुडदेव स्वर्गातून अमृत कलश घेऊन आले. तेव्हा त्यांनी ते काही वेळ पवित्रकावर ठेवले. दर्फावर अमृत कलश ठेवल्याने त्याला अतिशय पवित्र मानले जाते. 


परंपरा 2. श्राद्ध करताना काक, गायी आणि श्वानांना भोजन का दिले जाते?
उत्तर 
- ग्रंथानुसार, कावळा यमाचा प्रतिक आहे. जो दिशांचा फलित (शुभ-अशुभ संकेत देणारा) देणारा असतो. त्यामुळे, श्राद्धचा एक अंश याला दिला जातो. कावळ्यांना पित्रांचे स्वरुप देखील मानले जाते. श्राद्धाचे भोजन कावळ्यांना दिल्याने पितृ देवता प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे.
श्राद्धाच्या भोजनाचा एक भाग गायींना दिला जातो कारण, धर्म ग्रंथांमध्ये गायीला वैतरणी पार करणारी म्हटले आहे. - गायीत सर्वच देवता निवास करतात. गायींना भोजन दिल्याने देवता प्रसन्न होतात. 
- श्वान यमराजचा पशू मानला जातो. यमराजला प्रसन्न करण्यासाठी श्राद्धचा एक अंश श्वानाला दिला जातो. शिवमहापुराणनुसार, श्वानाला चपाती खाऊ घालताना म्हणायला हवे, की यमराजाच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम आणि शबल नावाचे दोन श्वान आहेत, मी त्यांच्यासाठी या अन्नाचा भाग देतो. त्यांनी हे बळी (भोजन) ग्रहण करावे. याला कुक्करबळी असेही म्हणतात.

बातम्या आणखी आहेत...