आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्राद्ध पक्षात खाऊ नये पान, 9 ऑक्टोबरपर्यंत लक्षात ठेवा या 7 गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 25 सप्टेंबरपासून श्राद्ध पक्षाला सुरुवात झाली असून 9 ऑक्टोबरपर्यंत हा पक्ष राहील. श्राद्ध पक्षामध्ये पितर म्हणजे पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण, पिंडदान इ. कर्म केले जातात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार आपल्या धर्म शास्त्रामध्ये श्राद्ध पक्षासाठी विविध नियम सांगण्यात आले आहेत. असे मानले जाते की, या नियमांचे पालन केल्यास पितर आपल्यावर संतुष्ट होऊन शुभफळ प्रदान करतात. यामुळे पितरांच्या प्रसन्नतेसाठी या नियामंचे पालन करणे आवश्यक आहे. येथे जाणून घ्या, खास नियम...


1- धर्म शास्त्रानुसार श्राद्ध पक्षामध्ये शरीराला तेल मालिश करू नये. या दिवसांमध्ये पानसुद्धा खाऊ नये. 


2- श्राद्ध काळामध्ये क्षौर कर्म म्हणजे केस कापणे, दाढी करणे, नख कापणे इ. गोष्टी करू नयेत.


3- जो पुरुष श्राद्धाचे दान करून किंवा श्राद्ध भोजन केल्यानंतर स्त्रीसोबत समागम करतो, त्याच्यावर पितर कधीही प्रसन्न होत नाहीत. यामुळे श्राद्धाच्या दिवशी स्त्री समागम करू नये.


4- श्राद्ध पक्ष काळात इतरांचे अन्न खाऊ नये. या दिवसांमध्ये मसुराची डाळ, हरभरे, लसुन, कांदा, काळे जिरे, काळे उडीद, काळे मीठ खाणे या गोष्टी वर्ज्य सांगण्यात आल्या आहे. यामुळे स्वयंपाकात या गोष्टीचा वापर करू नये.

बातम्या आणखी आहेत...