पितृपक्ष / 28 सप्टेंबरला अमावास्या, पाण्यामध्ये तीळ आणि फुल टाकून करावे तर्पण 

एखाद्याची मृत्यू तिथी माहिती नसल्यास अमावास्येला करू शकता त्याचे श्राद्ध कर्म

Sep 22,2019 12:05:00 AM IST

सध्या पितरांसाठी विशेष पूजा-पाठ करण्याचा काळ पितृपक्ष सुरु आहे. या काळात पितरांसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान हे शुभ कर्म केले जातात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पितृ पक्षात केलेल्या शुभ कामामुळे पितरांना तृप्ती मिळते. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची तिथी माहिती नसल्यास त्याचे श्राद्ध पितृ पक्षाच्या अमावस्या तिथीला करावे. यावर्षी अमावस्या शनिवार 28 सप्टेंबरला आहे. येथे जाणून घ्या, पितृ पक्षात करण्यात येणाऱ्या काही शुभ कामाशी संबंधित खास गोष्टी...

  • पितृ पक्षाशी संबंधित मान्यता

पं. शर्मा यांच्यानुसार, पितृ पक्षामध्ये कुटुंबातील पितर देवता पृथ्वीवर येतात. कुटुंबातील मृत सदस्यांच्या मृत्यू तिथीला पितृ पक्षामध्ये तर्पण, श्राद्ध इ. पुण्यकर्म केले जातात. पिंडदान, अन्न आणि जल ग्रहणाच्या इच्छेने पितर देवता आपल्या कुटुंबाजवळ येतात. त्यांच्या तृप्तीसाठी सर्व शुभ काम केले जातात. यामुळे पितरांना शक्ती मिळते आणि ते पितृलोकापर्यंत सहजपणे प्रवास करतात अशी धार्मिक मान्यता आहे.

  • रोज करावे तर्पण

पितृ पक्षामध्ये रोज तर्पण करावे. यासाठी एखाद्या लहान कलशामध्ये पाणी घ्यावे, त्यामध्ये फुल आणि तीळ टाकावेत. त्यानंतर हे जल पितरांना अर्पित करावे. जल अर्पण करण्यासाठी हातामध्ये घेऊन अंगठ्याच्या माध्यमातून अर्पण करावे.

  • ब्राह्मणांना जेवू घालण्याचे महत्त्व

श्राद्ध पक्षामध्ये पितरांसाठी ब्राह्मणांना जेवू घालण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. आपल्या सामर्थ्यानुसार एखाद्या किंवा अधिक ब्राह्मण व्यक्तींना जेवू घालावे. सामर्थ्यानुसार धान्य आणि वस्त्र दान करावे. तर्पण इ. कर्म करण्यासाठी चांदीच्या भांड्याचा वापर करावा. चांदीचे भांडे या कर्मासाठी अत्यंत शुभ मानले जाते.

X