आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shraddha Talks About Her Role In 'Street Dancer' 'I Need To Hate My Est Friend Varun For The Character '

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'स्ट्रीट डान्सर'मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलली श्रद्धा - 'भूमिकेसाठी माझा खास मित्र वरुणचाही द्वेष करावा लागला'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आगामी चित्रपट 'स्ट्रीट डान्सर' अशातच रिलीज झाला आहे आणि यासोबतच इंडस्ट्रीमध्ये तिची दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात तिने बालपणीचा मित्र वरुण धवनसोबत काम केले आहे. यानिमित्ताने तिने आपल्या फिल्मी करिअरशी निगडित अनेक मुद्दे आणि अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल बातचीत केली. 

'साहो' मध्ये आपले दमदार अ‍ॅक्शन दाखवले, 'बागी 3' मध्येही तू अ‍ॅक्शन करताना दिसणार आहेस का ?

अ‍ॅक्शन तर माझ्या मते कमी आहे. यावेळी तशीही त्या चित्रपटाबद्दल जास्त काही सांगू शकत नाही. पण मला चांगले वाटते जेव्हा बोलतात की, टायगरसोबत माझे ऑन स्क्रीन पेयरिंग खूप छान दिसते. टायगर शाळेत माझ्यापेक्षा तीन वर्षे जूनियर होता. शाळेत तर मी त्याच्यापेक्षा उंच होते, तो बास्केटबॉल ड्रेसमध्ये शाळेच्या कॉरीडोअरमध्ये पळायचा. अचानक मला पाहिल्यानंतर खूप शांत गरीब मुलासारखे गोड आवाजात हाय श्रद्धा म्हणायचा आणि निघून जायचा. टायगर खऱ्या आयुष्यात खूप चांगला माणूस आहे. सेटवर प्रत्येकाशी तो बोलतो. नेहमी आपला कंसर्न दाखवतो. अशा लोकांसोबत काम करणे चांगले वाटते. 

वरुण धवनच्या अपोजिट तू पहिल्यांदा 'स्ट्रीट डान्सर' मध्ये त्याच्या विरुद्ध पार्टीचा रोल केला. रियल लाइफमध्ये तुम्ही दोघे चांगले मित्र आहात. स्क्रीनवर त्याच्यासाठी द्वेष कसा आणू शकलीस ?

हे खरंच खूप कठीण होते. चित्रपटात मी इनायत नावाच्या मुलीची भूमिका केली आहे, जी खूप अग्रेसिव्ह आहे. रियल लाइफमध्ये मी तशी नाहीये. पण अ‍ॅक्टिंगची तीच तर मजा आहे. स्वतःच्या विरुद्ध स्वभावाच्या व्यक्तीच्या भूमिका पार पडू शकणे. तसेच समोर वरुण होता जो माझा अत्यंत चांगला मित्र आहे आणि खूप चांगला माणूसही आहे. पण जशी तशी मी माझ्या कॅरेक्टरमध्ये जाऊन वरुणचा द्वेष केला, जो खऱ्या आयुष्यात करणे कधीच शक्य नाही. 


तू आणि वरुण डान्स जॉनरव्यतिरिक्त जर इतर काही ट्राय केले तर ते काय असेल
 ?

मला वरुणसोबत कॉमेडी करायची आहे. फुल ऑन कॉमेडी असावी, ज्यामध्ये आमच्या दोघांचेही पात्र ठार वेडे असेल. तशीही मला डेव्हिड अंकलची कॉमेडी नेहमीच आवडते. त्यामध्ये माझ्या वडिलांनीही काम केले आहे. 

करिअरच्या या फेजमध्ये तू किती संतुष्ट आहेस ?

मी यावेळी माझ्या करिअरच्या उत्तम फेजमध्ये आहे. असे कमर्शियल चित्रपट मिळत आहेत जे लार्जर दॅन लाइफ टॉपिक आहेत. जसे की, 'स्ट्रीट डान्सर' मध्ये मला खूप जवळून लंडन आणि बाकीच्या देशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळाली. हे समजून घेण्याची संधी मिळाली की, डान्स खूपच पॉवरफुल मीडियम आहे. 

लव्ह रंजनचा चित्रपट केव्हा सुरु होत आहे ?

तो चित्रपट 'बागी 3' पूर्ण होताच मार्चच्या मध्यापर्यंत सुरु होईल. चित्रपटात माझ्या अपोजिट रणबीर आहे. त्याच्यासोबत हा माझा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात माझे पात्र काहीसे असे आहे, जे लोकांनी आजपर्यंत पाहिलेले नाही, हे मला माझ्या कंफर्ट झोनमधून बाहेर घेऊन जाते. यासाठी मला फिजिकली तर नाही पण मेंटली खूप तयारी करावी लागेल.