आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : 'दिलबर दिलबर' गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री नोरा फतेही सध्या खूप चर्चेत आहे. अशातच नोरा फतेही आणि श्रद्धा कपूर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये श्रद्धा कपूर आणि नोरा फतेही यांच्यामध्ये डान्स कॉम्पिटीशन झालेले दिसत आहे. जेव्हा दोघींचा डान्स सुरु असताना मधेच इंटरफेयर करण्यासाठी वरुण धवन आला तर श्रद्धाने त्याला पळवून लावले. त्यांनतर श्रद्धाने एक डान्स स्टेप करून नोराला चॅलेंज दिले.
नोराने स्वीकारले श्राद्धाचे चॅलेंज...
त्यांनतर नोरा फतेहीने श्रद्धा कपूरचे चॅलेंज एक्सेप्ट केले आणि एका वेगळ्याच स्टाईलमध्ये डान्स केला. मात्र या डान्स कॉम्पिटिशनमध्ये कोण हरले कोण जिंकले हे तर कळले नाही पण डान्सनंतर दोघीही एकमेकींना आलिंगन देऊन हसताना दिसत आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर श्रद्धा कपूर लवकरच 'बाहुबली' फेम प्रभाससोबत फिल्म 'साहो' मध्ये दिसणार आहे. तर नोरा फतेही सलमान खानची मोस्टअवेटेड फिल्म 'भारत' मध्ये दिसणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.