आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्ति कपूरची मुलगी श्रद्धा कपूरच्या लग्नाची आली डेट, कथित बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठासोबत करणार लग्न ?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सध्या बॉलिवूडमध्ये जणू काही लग्नाचे सीजन सुरु आहे. एकानंतर एक अभिनेते आणि अभिनेत्रींच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. आता बातमी आहे की, शक्ति कपूरची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आपला कथित बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठासोबत लग्न करणार आहे. 

पुढच्यावर्षी करू शकते लग्न...
रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा कपूर फोटोग्राफर रोहन श्रेष्ठासोबत पुढच्यावर्षी लग्न करू शकते. अशी चर्चा आहे की, हे दोघे  2018 पासून एकमेकांना डेट करत आहेत. तसेच असेही बोलले जात आहे की, नात्यामुळे श्रद्धाचे पिता शक्ति कपूरदेखील खूप खुश आहेत. लग्नाबद्दल श्रद्धा आणि रोहनचे बोलणेही झाले आहे. मात्र श्रद्धाने अजूनही कोणती अधिकृत घोषणा केलेली नाही. यापूर्वी श्रद्धा अभिनेता फरहान अख्तरला डेट करत होती. पण शक्ति कपूर या नात्यामुळे नाराज होते, ज्यामुळे कुटुंबाच्या दबावामुळे श्रद्धाला हे नाते तोडावे लागले. आता फरहान, अभिनेत्री शिवानी दांडेकरला डेट करत आहे. दोघांच्या बाबतीत चर्चा होती की, त्यांनी साखरपुडादेखील केला आहे आणि एप्रिल किंवा मेमध्ये लग्न देखील करू शकतात. 

यावर्षी हे स्टार्स करू शकतात लग्न... 
रिपोर्ट्सनुसार, यावर्षी फरहान-शिवानी यांच्याव्यतिरिक्त अर्जुन कपूर- मलायका अरोरा आणि रणबीर कपूर-आलिया भट्टदेखील लग्न करू शकतात. मात्र लग्नाबाबतीत अजूनही या जोड्यांचे कोणतेही ऑफिशल कन्फर्मेशन आलेले नाही. 

बातम्या आणखी आहेत...