आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलिया, दीपिका, प्रियांकाला पछाडत श्रद्धा कपूर इंस्टाग्रामवर बनली नंबर वन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून आगामी चित्रपट 'स्त्री'मुळे चर्चेत असलेली 'आशिकी गर्ल' श्रध्दा कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियानुसार इंस्टाग्रामवर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बनली आहे. विशेष म्हणजे श्रद्धाने आलिया भट, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणसारख्या मात्तब्बर अभिनेत्रींना मागे टाकतं इंस्टाग्रामवर नंबर वन स्थान पटकावण्यात यश मिळवलं आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

इंस्टाग्रामवर श्रद्धा 100 गुणांसह सर्वश्रेष्ठ बनली आहे. तर अलिया भट 85 गुणांसह दूस-या स्थानावर पोहोचली आहे. दीपिका पादुकोण 68 गुणांमूळे तिस-या पदावर तर प्रियांका चोप्रा 66 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. सोनम कपूर अहुजा 59 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

 

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात की, "एका महिन्याच्या आत सातव्या स्थानावरून सरळ अग्रस्थानी पोहोचलेल्या श्रद्धाने आपल्या बॉलिवूडमधल्या सर्व स्पर्धकांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. तिची वाटचाल नक्कीच उल्लेखनीय म्हणायला हवी. राजकुमार रावसोबतची फिल्म 'स्त्री' आणि शाहिद कपूर सोबतची फिल्म 'बत्ती गुल मीटर चालू'मूळे तिची बरीच पब्लिसिटी होतेय. याच पब्लिसिटीनूसार श्रध्दाच्या इन्स्टा पोस्ट आणि इन्स्टा स्टोरीज असतात. त्यामूळेच तर श्रध्दाच्या इंस्टाग्रामच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे."

 

अश्वनी कौल पूढे म्हणतात, "श्रध्दा आपल्या कुटूंबासोबतचे फोटोही पोस्ट करते. ज्यामूळे तिच्या लोकप्रियतेत वाढ होत असते. 4 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

बातम्या आणखी आहेत...