आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्राद्ध कर्मासाठी दिवसाचा दुसरा प्रहर मानला गेला आहे श्रेष्ठ, पितृपक्षाशी संबंधित खास गोष्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू पंचांगानुसार, भाद्रपद मासातील पक्ष पंधरवडा पितरांच्या पूजेसाठी नियत आहे. या काळात पितरांच्या आत्मशांतीसाठी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पूर्वजांसाठी करण्यात येणारे श्राद्ध शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या योग्य वेळेला करणे शुभफलदायी मानले जाते. जाणून घ्या, तर्पण आणि श्राद्ध कर्म करण्याचा श्रेष्ठ काळ...

1. पितृ शांतीसाठी तर्पणचा श्रेष्ठ काळ संगवकाळ म्हणजेच सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंतचा मानला गेला आहे. या दरम्यान केल्या गेलेल्या तर्पण विधीमुळे पितर तृप्त होण्यासोबतच पितृदोष आणि पितृ ऋणातून मुक्ती मिळते.

2. तर्पण केल्यानंतर श्राद्ध कर्म करण्यासाठी सर्वात श्रेष्ठ काळ कुपतकाळ आहे. हा काळ प्रत्येक तिथीला सकाळी 11.36 पासून दुपारी 12.24 पर्यंत राहतो.

3. धार्मिक मान्यतेनुसार या काळात पितृगणांचे मुख पश्चिम दिशेकडे असते. या स्थितीमध्ये पितर आपल्या वंशजांनी केलेल्या श्राद्धाचा भोग सहजतेने ग्रहण करू शकतात.

4. यामुळे या वेळेला करण्यात आलेल्या पितृ कर्मामुळे पितर प्रसन्न होतात.

5. पितरांच्या तृप्तीने मनुष्याला आयु, वीर्य आणि धन प्राप्ती होते.

6. ब्रह्माजी, पुलस्त्य, वशिष्ठ, पुलह, अंगिरा. क्रतू आणि महर्षी कश्यप हे सात ऋषी महान योगेश्वर आणि पितर मानण्यात आले आहेत.

7. अग्निमध्ये हवन केल्यानंतर जे पितरांसाठी पिंडदान करतात त्याला ब्रह्मराक्षसही दूषित करू शकत नाहीत. श्राद्धामध्ये अग्निदेवाला उपस्थित पाहून राक्षसही तेथून पळून जातात.

8. सर्वात पहिले वडिलांना, त्यानंतर आजोबांना आणि त्यानंतर पंजोबांना पिंड द्यावे. हाच श्राद्धाचा विधी आहे.

9. प्रत्येक पिंड देताना एकाग्रचित्त होऊन गायत्री मंत्राचा जप तसेच सोमाय पितृमते स्वाहा उच्चार करावा.

10. तर्पण करताना वडील, आजोबा आणि पंजोबा इ. नावांचा स्पष्ट उच्चार करावा.

बातम्या आणखी आहेत...