आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 दिवस रोज करा हा 1 उपाय, कमी होऊ शकतो पितृ दोषाचा प्रभाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी श्राद्ध पक्षाची सुरुवात 25 सप्टेंबरपासून झाली असून 9 ऑक्टोबरपर्यंत हा पक्ष राहील. या 16 दिवसांमध्ये पितरांच्या आत्मा शांतीसाठी रोज श्राद्ध, पिंडदान, तर्पण केले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार एखादा व्यक्ती श्राद्ध कर्म करण्यास सक्षम नसेल तर त्याने एक छोटासा उपाय करावा. यामुळे पितरांची कृपा प्राप्त होऊ शकते. हा उपाय रोज 16 दिवस केल्याने पितृदोषाचा प्रभाव कमी होऊ शकतो.


श्राद्धामध्ये रोज करावा हा उपाय 
- श्राद्ध पक्ष काळात रोज सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे आणि पितरांच्या आत्मा शांतीसाठी प्रार्थना करावी.
- त्यानंतर घरातील एखादी जागा स्वच्छ करून घ्यावी. मातीच्या भांड्यामध्ये गायीच्या शेणाची गोवरी जाळावी.
- जळत्या गोवारीवर तूप-गूळ आणि घरामध्ये तयार झालेल्या अन्नाने धूप द्यावी. म्हणजेच स्वतःच्या हाताने थोडेथोडे तूप-गूळ आणि अन्न गोवरीवर टाकावे.
- कमीत कमी पाच वेळेस तूप-गूळ आणि अन्नाने धूप द्यावी. प्रत्येक वेळी धूप देताना खालील मंत्राचा उच्चार करावा...
ऊँ पितृभ्य स्वधायीभ्य स्वधा नम: पितामयभ्य: स्वधायीभ्य स्वधा नम: प्रपितामयभ्य स्वधायीभ्य स्वधा नम: 
- त्यानंतर कलशाने हातामध्ये पाणी घ्यावी आणि अंगठ्याच्या माध्यमातून जमिनीवर सोडावे.
- त्यानंतर आपल्या पितरांना नमस्कार करून त्यांच्या आत्मा शांतीसाठी प्रार्थना करावी. 16 दिवस रोज हा उपाय केल्यास पितरांच्या तीन पिढ्या तृप्त होतात.

बातम्या आणखी आहेत...