श्राद्ध / 14 सप्टेंबरपासून पितृपक्ष, चांदी किंवा तांब्याच्या भांड्याचा वापर करावा श्राद्ध कर्मात

श्राद्धामध्ये प्रसन्न पितृगण मनुष्याला पुत्र, धन, दीर्घायुष्य आणि स्वर्ग प्रदान करतात

रिलिजन डेस्क

Sep 13,2019 12:05:00 AM IST

शनिवार 14 सप्टेंबरपासून श्राद्धपक्ष सुरु होत आहे. धर्म ग्रंथानुसार श्राद्धाच्या 16 दिवसांमध्ये लोक आपल्या पितरांना जल देतात तसेच त्यांच्या मृत्यू तिथीला श्राद्ध करतात. पितरांचे ऋण श्राद्धाच्या रुपात फेडले जाते. श्राद्धाशी संबंधित अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या फार कमी लोकांना माहिती असाव्यात. परंतु या गोष्टी श्राद्ध करण्यापूर्वी जाणून घेणे आवश्यक आहेत, कारण अनेकवेळा विधीपूर्वक श्राद्ध न केल्यास पितर शाप देतात. आज आम्ही तुम्हाला श्राद्धाशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत.


1. श्राद्धामध्ये चांदीच्या भांड्याचा उपयोग व दान पुण्यप्रद असण्यासोबतच राक्षसांचा नाश करणारा आहे. पितरांना चांदीच्या भांड्यातून जल अर्पण केल्यास ते अक्षय तृप्तीकारक राहते. पितरांसाठी अर्घ्य, पिंड आणि भोजनाचे पत्र चांदीचे असेल तर आणखी श्रेष्ठ मानले जाते. श्राद्धामध्ये सोने, तांब, चांदी, काशाचे भांडे उत्तम राहते. यांच्या अभावामध्ये पत्राळीचा उपयोग करू शकता. केळीच्या पानावर श्राद्धाचे भोजन करू नये.


2. श्राद्ध कर्मामध्ये गायीचे दुध, तूप, दह्याचा उपयोग करावा. हे लक्षात ठेवावे की, गाईला वासरू होऊन दहा दिवस झालेले असावेत. गाईने वासराला जन्म देऊन दहा दिवस झाले नसतील तर त्या दुधाचा श्राद्ध कर्मात उपयोग करू नये.


3. श्राद्धामध्ये ब्राह्मणाला जेवण वाढण्यासाठी उपयोगात आणले जाणारे भांडे दोन्ही हाताने धरावे, एक हाताने पकडून आणलेल्या अन्नपात्रातून वाढलेले जेवण राक्षस हिसकावून घेतात.


4. ब्राह्मणांनी मौन राहून आणि व्यंजनांची प्रशंसा न करता जेवण करावे. कारण पितर तोपर्यंतच जेवण ग्रहण करतात, जोपर्यंत ब्राह्मण मौन राहून जेवण करतात.


5. श्राद्ध करतना एखादा भिकारी दारामध्ये आला तर त्याला आदरपूर्वक जेवण वाढावे. जो व्यक्ती अशावेळी घरी आलेल्या याचकाला पळवून लावतो त्याचे श्राद्ध कर्म पूर्ण मानले जात नाही आणि त्याचे फळही नष्ट होते.


6. श्राद्धामध्ये प्रसन्न पितृगण मनुष्याला पुत्र, धन, विद्या, दीर्घायुष्य, निरोगी शरीर, मोक्ष आणि स्वर्ग प्रदान करतात.


7. कुत्रा आणि कावळ्यासाठी काढून ठेवलेले अन्न कुत्रा आणि कावळ्यालाच खाऊ घालावे आणि देवता आणि मुंग्यासाठी काढून ठेवलेले अन्न गाईची खाऊ घालू शकता. त्यानंतर ब्राह्मणांना जेवण वाढावे. जेवण झाल्यानंतर ब्राह्मणांना दक्षिणा अवश्य द्यावी.


8. जेवण झाल्यानंतर ब्राह्मणांना घराच्या मुख्य दरवाजापर्यंत पूर्ण सन्मानाने घेऊन जावे. कारण ब्राह्मणांसोबत पितरसुद्धा घराबाहेर पडतात.

X
COMMENT