आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश-अपयशाने मला अजिबात फरक पडत नाही : श्रद्धा कपूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: 'स्त्री' या चित्रपटातून श्रध्दा कपूर आपल्या भेटीस येणार आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी चित्रपटानंतर श्रद्धा कपूरचे चार चित्रपट प्रदर्शित झाले. यापैकी रॉक ऑन 2 आणि ओके जानू बॉक्स ऑफिसवर टिकले नाहीत. हाफ गर्लफ्रेंड हिट ठरला, मात्र हसीना पारकर फ्लॉप ठरला. या मुलाखतीत श्रद्धाने करिअरमध्ये आलेल्या चढ-उताराविषयी चर्चा केली. 

 

'स्त्री' वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. त्यामुळे निवडला का? 
या चित्रपटाची पटकथा जेव्हा मी वाचत होते, तेव्हा पूर्णवेळ हसत राहायचे. त्यामुळे याची निवड केली. माझ्यासाठी ही खूपच फनी स्क्रिप्ट आहे. त्यामुळे मी याचा भाग होऊ इच्छित होते. याची पटकथा लिहिण्यापूर्वी दिनेश विजान यांनी मला तुझ्यासाठी माझ्याकडे काही स्पेशल असल्याचे सांगितले होते. मात्र, हे खरंच इतके स्पशेल असेल, असे वाटले नव्हते. चित्रपटात राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठीसारख्या कलावंतांसोबत काम करणे माझ्यासाठी बोनससारखे होते. 

 

- करिअरच्या सुरुवातीलाच तू अपयश चाखलेस, जेव्हा तुझे दोन (तीन पत्ती आणि लव का द एंड) चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळले तेव्हाच तू अपयशाला स्वीकार केले होते का ? 
मला मान्य आहे की, सुरुवातीच्या काही चित्रपटांना यश मिळाले नाही. मात्र, हा चित्रपट चालेल की फ्लॉप होईल हे आधीच कुणी सांगू शकत नाही. मी करिअरच्या सुरुवातीलाच खूप चढ-उतार पाहिले. त्यामुळे मला आता यश आणि अपयशामुळे काही फरक पडत नाही. दोन्हीला हँडल करणे मला जमले आहे.
 
-  आशिकी 2 नंतर तुमचे चार चित्रपट (एक विलन, हैदर, एबीसीडी 2 आणि बागी) हिट ठरले. या यशानंतर रॉक ऑन 2 


फ्लॉप ठरला. तेव्हा वाईट वाटले का ? 

हो वाटले होते... कारण प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचवण्यासाठी अनेक लोकांना मेहनत घ्यावी लागते. यात तुम्ही मनापासून मेहनत घेता आणि प्रेक्षक त्याला आकारतात. मात्र, मी थांबले नाही. मी मान खाली घातली आणि आपले काम करत राहिले. 

 

- 'स्त्री' मध्ये काम करताना सर्वात जास्त आव्हान काय होते? 
राजकुमार राव, पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुरानासारख्या कलावंतांसोबत काम करणे आव्हान होते. मी राज आणि डीकेच्या चित्रपटाची खूप मोठी फॅन आहे. त्यांच्या चित्रपटांतून खूप काही शिकायला मिळते. स्त्री एक इनोव्हेटिव्ह चित्रपट आहे. 

 

- तुला हॉरर चित्रपटात काम करायला आवडेल का? 
हॉरर-कॉमेडी करू शकते. कारण यात कॉमेडी असते. मात्र, पूर्ण हॉरर चित्रपट करू शकणार नाही. मला खूप भीती वाटते. 'स्त्री' पाहतानादेखील मी चेहरा लपवला होता. 

बातम्या आणखी आहेत...