Home | Jeevan Mantra | Dharm | shravan 2018 Easy Worship Method Of Shivaji

श्रावणात शिव पूजेचा सोपा विधी, मंदिरात जाणे शक्य नसल्यास घरीच करू शकता पूजा

रिलिजन डेस्क | Update - Aug 20, 2018, 12:03 AM IST

आज (20 ऑगस्ट, सोमवार) श्रावण मासातील दुसरा सोमवार आहे. या संपूर्ण महिन्यात शिव पूजेचे विशेष महत्त्व आहे.

 • shravan 2018 Easy Worship Method Of Shivaji

  आज (20 ऑगस्ट, सोमवार) श्रावण मासातील दुसरा सोमवार आहे. या संपूर्ण महिन्यात शिव पूजेचे विशेष महत्त्व आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार, महादेव पूजेचा विधी अत्यंत विस्तृत असल्यामुळे वर्तमानातील धावपळीच्या जीवनात पूजेसाठी एवढा वेळ कदाचितच फार कमी लोकांकडे असावा. अशा परिस्थितीमध्ये अगदी सोप्या विधीनुसार महादेवाची पूजा श्रावणातील प्रत्येक दिवशी केली जाऊ शकते. या सोप्या पूजन विधीने संपूर्ण फळ प्राप्त होऊ शकते.


  1. श्रावणात रोज सकाळी लवकर स्नान करून पवित्र होऊन एखाद्या शिव मंदिरात जावे. महादेवाला स्वच्छ जल अर्पण करावे. मंदिरात जाणे शक्य नसल्यास घरीच शिवलिंगावर जल अर्पण करू शकता.
  2. त्यानंतर कच्च्या दुधाने शिवलिंगाचा अभिषेक करून पुन्हा शुद्ध जल अर्पण करावे.
  3. शिवलिंगावर बेलाचे पान आणि फुल अर्पण करावे.
  4. फुल रुईचे असल्यास अत्यंत उत्तम राहील. यासोबतच धोतऱ्याचे फुलंही अर्पण करू शकता.
  5. त्यानंतर महादेवासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. फळांचा नैवेद्य दाखवावा.
  6. यानंतर आरती करावी.
  7. सर्वात शेवटी हात जोडून महादेवाकडे इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करावी.

Trending