श्रावणी सोमवार : / श्रावणी सोमवार : जाणून घ्या, शिवमूठ वाहण्याचे महत्त्व

Aug 13,2018 12:02:00 AM IST

प्रत्येक सुनेला वाटते, की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा आपण त्या घरातले आवडते व्यक्तिमत्त्व बनावे, पण, हे होत नसेल तर सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे. तो वसा केल्याने सासुरवाशीण आपल्या सासरच्या माणसाची आवडती बनते. तो वसा म्हणजे शिवमुठ...


कशी वाहायची शिवमूठ
पहिल्या सोमवारी तांदूळ, गंध, फुले व दूध, दुसर्‍या सोमवारी तीळ, तिसर्‍या सोमवारी मुगाची डाळ, चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा सोमवार आला तर सातू हे धान्य घेऊन शिवामूठ वाहायची. ती वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा ही, असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी. या दिवशी सायंकाळपर्यंत उपवास करावा. उष्टे खाऊ नये. सायंकाळी आंघोळ करून देवास बेल वाहावा. अशा प्रकारे व्रत पार पाडतात.


अशी ही शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो. ती प्रत्येक महिलेने वाहावी. आपल्या घरात आनंदाचे व सुख समृद्धीचे वातावरण निर्माण करावे व आपण ते वाटून घेण्याची वृत्ती जोपासावी.

X