श्रावणात घरी आणा / श्रावणात घरी आणा या 4 पैकी कोणतीही 1 वस्तू, महादेव कृपेने दूर होतील सर्व अडचणी

Aug 13,2018 12:04:00 PM IST

या वर्षी 12 ऑगस्ट, रविवारपासून श्रावण मास सुरु झाला आहे. हिंदू धर्मामध्ये या महिन्याचे विशेष महत्त्व आहे. कारण या महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, या काळात सृष्टीचे संचालन महादेव करतात. यामुळे श्रावण मासात काही खास गोष्टी घरात घेऊन आल्यास महादेवाची कृपा कुटुंबावर राहते. श्रावणात कोणकोणत्या वस्तू घरी आणाव्यात...


1. पारद शिवलिंग
पारद शिवलिंगाची दररोज घरात पूजा केल्यास सर्व प्रकारचे दोष- उदा. पितृदोष, कालसर्पदोष, वास्तुदोष इ. आपोआप नष्ट होतात. श्रावणात पारद शिवलिंग देवघरात स्थापन करावे.


2. एक मुखी रुद्राक्ष
शिवपुराणानुसार एकमुखी रुद्राक्ष साक्षात महादेवाचे स्वरूप आहे. हा गळ्यात धारण केल्याने मनुष्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. या रुद्राक्षाची पूजा करून धन स्थानी म्हणले तिजोरीत ठेवल्यास आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टींविषयी...

3. महामृत्युंजय यंत्र ज्या घरामध्ये दररोज महामृत्युंजय यंत्राची पूजा होते, तेथे कोणत्याही प्रकारची अडचण राहत नाही. श्रावणाच्या पवित्र महिन्यात महामृत्युंजय यंत्र घरी आणून देवघरात स्थापन करावे. नियमितपणे याची पूजा केल्यास घरात सुख-समृद्धी कायम राहते.4. गर्भगौरी रुद्राक्ष ज्या लोकांना अपत्य प्राप्तीची अडचण असेल त्यांनी श्रावण मासात घरामध्ये गर्भगौरी रुद्राक्षची स्थापना करून नियमितपणे पूजा करावी. या उपायाने तुमची अपत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते.
X