आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रावण महिना महादेवाच्या भक्तीचा विशेष दिवस असून या महिन्यातील आता 7 दिवस शिल्लक राहिले आहेत. जो व्यक्ती व्यक्ती या काळात महादेवाची मनोभावे भक्ती करतो त्याचे सर्व दुःख दूर होतात अशी मान्यता आहे. कार्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात आणि देवी-देवतांची कृपा प्राप्त होते. याच कारणामुळे देशभरातील सर्व शिव मंदिरांमध्ये याकाळात भक्तांची गर्दी दिसून येते. शास्त्रानुसार या उपासनेच्या काळात काही कामे वर्ज्य सांगण्यात आली आहेत. जे लोक वर्ज्य सांगण्यात आलेली कामे करतात त्यांना महादेवाची कृपा प्राप्त होत नाही तसेच त्यांच्या अडचणी वाढतात. येथे जाणून घ्या, श्रावणातील या 7 दिवसांमध्ये कोणत्या 7 कामांपासून दूर राहावे.
शिवलिंगावर हळद अर्पण करू नये
महादेवाची पूजा करताना लक्षात ठेवावे की,शिवलिंगावर हळद अर्पण करू नये. हळद स्त्रीशी संबंधित वस्तू आहे. शिवलिंग पुरुष तत्वाशी संबंधित असून हे महादेवाचे प्रतिक आहे. यामुळे शिवलिंगावर हळद अर्पण करू नये.
वाईट विचारांपासून दूर राहा
या काळात कोणत्याही प्रकारच्या वाईट विचारांपासून दूर राहावे. वाईट विचार उदा. इतरांचे नुकसान करण्यासाठी योजना आखणे, अधार्मिक काम करण्याचा विचार करणे, स्त्रियांबद्दल वाईट विचार करणे. अशाप्रकारच्या विचारांपासून दूर राहावे. हे विचार मनात असल्यास महादेवाच्या उपासनेत मन लागणार नाही. शास्त्रामध्ये स्त्रियांबद्दल वाईट विचार करणे महापाप मानण्यात आले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी उत्तम साहित्य किंवा धर्माशी संबंधित पुस्तकांचे अध्ययन करावे. यामुळे वाईट विचार दूर राहतात.
पती-पत्नीने लक्षात ठेवाव्यात या गोष्टी
अनेक कुटुंबातील पती-पत्नीमध्ये वाद-विवाद, छोटे-मोठे भांडण नेहमी होत राहतात. ही सामान्य गोष्ट आहे परंतु, जेव्हा छोट्या-छोट्या गोष्टी वाढतात तेव्हा घर अशांत होते. श्रावण महिन्यात घरामध्ये चुकूनही कलहाचे वातावरण तयार होऊ देऊ नये. ज्या घरांमध्ये कलहाचे वातावरण असते तेथे देवी-देवता निवास करत नाहीत. श्रावणात महदेवाची कृपा प्राप्त करण्याची इच्छा असेल तर घरामध्ये शांत आणि पवित्र वातावरण निर्माण करा. घरामध्ये शांती असेल तर जीवन सुखी होईल आणि मन प्रसन्न राहील. प्रसन्न मनाने पूजा केल्यास सर्व इच्छा लवकर पूर्ण होऊ शकतात.
सकाळी उशिरापर्यंत झोपू नये
पूजा करण्यासाठी सकाळची वेळ सर्वात योग्य असते. यामुळे तुम्हाला महादेवाची कृपा प्राप्त करण्याची इच्छा असेल तर सकाळी लवकर अंथरून सोडावे. सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र होऊन महादेवाची पूजा करावी. उशिरापर्यंत झोपल्याने आळस वाढतो. सकाळी लवकर उठल्याने वातावरणाचा आरोग्य लाभ होतो. सकाळच्या वेळी मन शांत राहते आणि यामुळे पूजा एकाग्र मनाने होते. एकाग्र मनाने करण्यात आलेल्या पूजेचे शुभफळ लवकर प्राप्त होतात.
या लोकांचा करू नका अपमान
श्रावणात वृद्ध मंडळी, गुरु, भाऊ-बहिण, जोडीदार, आई-वडील, मित्र आणि ज्ञानी लोकांचा अपमान करू नये. श्रावण महिन्यात या नियमाचे अवश्य पालन करावे, अन्यथा महादेवाची कृपा प्राप्त होऊ शकत नाही. हे सर्व लोक प्रत्येक स्थितीमध्ये सन्मान पात्र आहेत, नेहमी यांना मान-सन्मान द्यावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.