आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणातील दुसरा सोमवार : महादेवाला मोगऱ्याचे फुल अर्पण केल्याने मिळते सुंदर पत्नी, वाचा इतरही उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (20 ऑगस्ट) श्रावण मासातील पहिला सोमवार आहे. हा दिवस शिव पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काही सोपे उपाय शिवपुराणात सांगण्यात आले आहेत. शिवपुराणानुसार, जाणून घ्या महादेवाला कोणते फुल अर्पण केल्यास त्याचे काय फळ मिळते...


1. पारिजातकाचे फुल शिवलिंगावर अर्पण केल्याने धन-संपत्ती वाढते.


2. चमेलीचे फुल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते.


3. शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो.


4. मोगऱ्याचे फुल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते.


5. जाई-जुइचे फुल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही.


6. लाल व पांढऱ्या रुइचे फुल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो.


7. कन्हेरीचे फुल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात.


8. प्राजक्तांच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुख-संपत्तीमध्ये वृद्धी होते.


9. धोतार्याचे फुल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात, जो कुळाचा उद्धार करतो.


10. दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते.

बातम्या आणखी आहेत...