Home | Jeevan Mantra | Dharm | shravan 2018 shiv parvati marriage place information in marathi

आजही येथे आहेत शिव-पार्वती यांच्या लग्नाच्या खुणा, ब्रह्मदेवाने केले होते पौरोहित्य

रिलिजन डेस्क | Update - Aug 24, 2018, 02:51 PM IST

महादेवाला पतिच्या रुपात मिळवण्यासाठी पार्वती देवीने कठोर तपस्या केली होती. पार्वची देवीच्या कठोर तपस्येनंतर महादेवाने त्

 • shravan 2018 shiv parvati marriage place information in marathi

  महादेवाला पतिच्या रुपात मिळवण्यासाठी पार्वती देवीने कठोर तपस्या केली होती. पार्वची देवीच्या कठोर तपस्येनंतर महादेवाने त्यांच्या विवाहाच्या प्रस्तावाला स्वीकारले होते. मान्यते प्रमाणे महादेव आणि पार्वतीचा विवाह उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात झाला होता. श्रावण मासाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला या देवी पार्वतीच्या या विवाह स्थळाची माहिती देत आहोत.


  त्रिर्युगी हे रुद्रप्रयाग जिल्ह्यातील एक गाव आहे. असे म्हटले जाते की, याच गावात महादेव आणि पार्वतीचे लग्न झाले होते. या गावात विष्णु देव आणि लक्ष्मी देवीचे एक मंदिर आहे. ज्याला महादेव-पार्वती विवाह स्थळाच्या रुपात ओळखले जाते. या मंदिराच्या परिसरात अशा अनेक गोष्टी आजही उपलब्ध आहे, ज्यांचा संबंध महादेव-पार्वतीच्या विवाहासोबत असल्याचे मानले जाते.


  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या महादेव पार्वतीच्या विवाहाच्या काही खुणांविषयी....

 • shravan 2018 shiv parvati marriage place information in marathi

  या ठिकाणी महादेव-पार्वती विवाह करताना बसले होते. याच ठिकाणी ब्रह्मदेवाने महादेव-पार्वतीचा विवाह लावून दिला होता.

 • shravan 2018 shiv parvati marriage place information in marathi

  अखंड धुनी
  ही त्रिर्युगी नारायण मंदिराची अखंड धुनी आहे. महादेवाने याच कुंडाच्या भोवती पार्वतीसोबत फेरे घेतले होते. आजही या कुंडामधील अग्नी विझलेली नाही. या मंदिरात लाकडांना प्रसादाच्या रुपात चढवले जाते. या पवित्र अग्नि कुंडाची राख श्रध्दाळू घरी घेऊन जातात. वैवाहिक जीवनात येणा-या समस्या दूर करण्यासाठी ही राख फायदेशीर आहे असे म्हटले जाते.

 • shravan 2018 shiv parvati marriage place information in marathi

  ब्रम्हकुंड
  हा ब्रम्हकुंड आहे. महादेव-पार्वतीच्या विवाहात ब्रम्ह देव पुरोहित बनले होते. याच कुंडात ब्रम्हदेवाने विवाहाच्या अगोदर स्नान केले होते. याच कारणामुळे याला ब्रम्ह कुंड म्हटले जाते. तीर्थयात्री या कुंडात अंघोळ करुन ब्रम्ह देवाचा आशिर्वात प्राप्त करतात.

 • shravan 2018 shiv parvati marriage place information in marathi

  विष्णु कुंड
  हे विष्णु कुंड आहे. महादेव-पार्वतीच्या लग्नात विष्णु देवाने पार्वतीच्या भावाची भुमिका निभावली होती. एक भाऊ आपल्या बहिणीसाठी लग्नात ज्या रिती निभावतो त्या सर्व रिती विष्णु देवानी निभावल्या होत्या. अशी मान्यता आहे की,  या कुंडात अंघोळ करुन विष्णु देवाने विवाह सहभाग घेतला होता. 

 • shravan 2018 shiv parvati marriage place information in marathi

  महादेवाला लग्नात दानमध्ये गाय मिळाली होती. मानले जाते की, याच स्तंभावर ती गाय बांधली होती.

Trending