आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षच्या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्रदेवाने केली होती सोमनाथ ज्योतिर्लिंगची स्थापना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 1 ऑगस्टपासून श्रावण मास सुरु होत आहे. संपूर्ण भारतामध्ये महादेवाचे 12 ज्योतिर्लिंग स्थित आहेत. यामधील सर्वात पहिले ज्योतिर्लिंग गुजरात राज्यात सौराष्ट्र येथे अरबी समुद्राच्या तटावर स्थित आहे. हे सृष्टीवरील पहिले ज्योतिर्लिंग असल्याचे मानले जाते.


शिवपुराणानुसार, प्रजापती दक्ष यांनी आपल्या 27 मुलींचे लग्न चंद्रदेवासोबत लावले होते. त्या सर्व पत्नींमध्ये रोहिणी नावाची पत्नी चंद्रदेवाला सर्वाधिक प्रिय होती. ही गोष्ट इतर पत्नींना आवडली नाही. ही गोष्ट त्यांनी वडील दक्ष यांना सांगितली, त्यानंतर दक्ष यांनी चंद्रदेवाला सर्व पत्नींना समान वागणूक देण्यास सांगितले, परंतु चंद्रदेव तयार झाले नाहीत. तेव्हा क्रोधीत होऊन दक्ष यांनी चंद्रदेवाला क्षय रोग होण्याचा शाप दिला. या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी शिव भक्त चंद्राने अरबी समुद्राच्या तटावर महादेवाची तपश्चर्या केली. चंद्रदेवाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेव प्रकट झाले आणि त्यांनी चंद्रदेवाला वरदान दिले. चंद्राने ज्या शिवलिंगाची स्थापना आणि पूजा केली ते महादेवाच्या आशीर्वादाने सोमेश्वर म्हणजेच सोमनाथ नावाने प्रसिद्ध झाले.


सोमनाथ मंदिराच्या भिंतीवरील मूर्तिकाम मंदिराची भव्यता दर्शवते. स्कंद पुराणातील प्रभासखंडमध्ये उल्लेख करण्यात आला आहे की, सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे नाव प्रत्येक नवीन सृष्टीमध्ये बदलत जाते. या क्रमामध्ये जेव्हा वर्तमान सृष्टीचा अंत होईल आणि ब्रह्मदेव नवीन सृष्टीची रचना करतील तेव्हा सोमनाथचे नाव 'प्राणनाथ' असेल. प्रलयानंतर नवीन सृष्टीमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग प्राणनाथ नावाने ओळखले जाईल.

बातम्या आणखी आहेत...