विवाहित असूनही स्मशानात / विवाहित असूनही स्मशानात का राहतात महादेव, यांचे गण भूत-प्रेत कशामुळे आहेत?

Aug 30,2018 12:02:00 AM IST

देवांचे देव महादेव हे अद्भुत व अविनाशी आहेत. महादेव जेवढे सरळ आहेत तेवढेच ते रहस्यमयसुध्दा आहेत. त्यांचे राहणीमान, निवासस्थान सर्वकाही इतर देवांपेक्षा वेगळे आहे. शिव स्मशानात निवास करतात, गळ्यात साप धारण करतात, भांग आणि धोतरा ग्रहण करतात असे विविध रहस्य यांच्याशी निगडीत आहेत. श्रावण मासाच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला महादेवाशी संबंधित काही रोचक गोष्टी आणि यामध्ये दडलेले लाईफ मॅनेजमेंटचे सूत्र सांगत आहोत.


भगवान शिव यांना स्मशानाचे निवास का मानले जाते?
महादेवाला संपूर्ण कुटुंब असलेले देवता मानले जाते, परंतु तीरीही ते स्मशानात निवास करतात. भगवान शिव संसारिक असूनही ते स्मशानात निवास करतात यामागे लाईफ मॅनेजमेंटचे एक गूढ सूत्र दडलेले आहे. हा संसार मोह-मायेचा प्रतिक असून स्मशान वैराग्याचे. महादेव सांगतात की, या संसारात राहून आपले कर्तव्य पूर्ण करावेत, परंतु मोहमायेपासून दूर राहावे. कारण हा संसार नश्वर आहे. कधी न कधी हे सर्व नष्ट होणार आहे. यामुळे संसारात राहून कोणताही मोह न बाळगता आपले कर्तव्य पूर्ण करत वैरागीप्रमाणे आचरण करावे.


भूत-प्रेत महादेवाचे गण का आहेत?
महादेवाला संहाराचे देवता मानण्यात आले आहे. म्हणजेच, जेव्हा मनुष्य आपल्या सर्व मर्यादा तोडू लागतो तेव्हा महादेव त्याचा संहार करतात. ज्या लोकांना आपल्या पाप कर्माचे फळ भोगावे लागते तेच प्रेतयोनी प्राप्त करतात. या सर्वांना महादेव दंडित करतात, कारण शिव संहार देवता आहेत. या कारणामुळे यांना भूत-प्रेतांचा देवता मानले जाते. वास्तवामध्ये जे भूत-प्रेत आहेत ते केवळ एक सूक्ष्म शरीराचे प्रतिक आहेत. महादेवाचा यामागे असा संदेश आहे की, प्रत्येक प्रकारचा जीव ज्याची सर्वजण घृणा करत किंवा त्याला घाबरतात तोसुद्धा महादेवाजवळ पोहोचू शकतो, अट केवळ एवढीच आहे की त्याने स्वतःचे सर्वस्व महादेवाला समर्पित करावे.


महादेव गळ्यात साप धारण का करतात, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

महादेवाच्या हातामध्ये त्रिशूळ का आहे? त्रिशूळ हे भगवान शिवाचे प्रमुख अस्त्र आहे. त्रिशूळाकडे पाहा... तीन तीक्ष्ण टोक दिसतात. तसे पाहिले तर हे अस्त्र संहाराचे प्रतीक आहे. परंतु वास्तवात त्रिशूळामागे फार मोठा गूढ अर्थ दडला आहे. या जगात तीन प्रकारच्या प्रवृत्ती आहेत... सत, रज आणि तम. सत म्हणजे सत्यगुण, रज म्हणजे सांसारिक आणि तम म्हणजे तामसी अर्थात निशाचरी प्रवृत्ती. प्रत्येक माणसात या तीन्ही प्रवृत्ती आढळून येतात. फक्त या प्रवृत्तींचे प्रमाण प्रत्येकात वेगवेगळे असते. त्रिशुळातील तीन टोक या तीन प्रवृत्तींचे प्रतिनिधीत्व करतात. भगवान शिव आपल्याला संदेश देतात की, या तीन्ही गुणांवर आपले नियंत्रण आहे. हा त्रिशूळ तेव्हाच उचला जेव्हा कठीण परिस्थिती असेल. तेव्हा या तीन्ही गुणांचा आवश्यकतेनुसार वापर करा.महादेव गळ्यात साप धारण का करतात? महादेव जेवढे रहस्यमयी आहेत तेवधेच त्यांचे वस्त्र आणि आभूषण विचित्र आहेत. संसारिक लोक या गोष्टींपासून दूरच राहतात. महादेव त्याच गोष्टी स्वतःजवळ बाळगतात. भगवान शिव एकमेव असे देवता आहेत, जे गळ्यात साप धारण करतात. वास्तवामध्ये साप एक धोकादायक प्राणी आहे, परंतु तो कोणालाही विनाकरण दंश करत नाही. साप परिस्थितिक तंत्राचा महत्त्वपूर्ण जीव आहे. लाईफ मॅनेजमेंट दृष्टीकोनातून पाहिल्यास महादेव गळ्यामध्ये साप धारण करून असा संदेश देतात की, जीवनचक्रात प्रत्येक प्राण्याचे विशेष योगदान आहे. यामुळे कधीही हिंसा करू नये.
X