Shravan / श्रावण सोमवार : एका क्लिकवर घ्या, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन

असे स्थापित झाले घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग...

रिलिजन डेस्क

Aug 05,2019 12:06:00 PM IST

आज श्रावण मासातील पहिला सोमवार आहे. हिंदू धर्मामध्ये श्रावण मासाला खूप पवित्र मानले जाते. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत. तत्पूर्वी या मंदिराचा एक खास नियम माहिती असणे आवश्यक आहे.


असा आहे नियम..
घृष्णेश्वर पाणीदार सर्व पुरुषांसाठी एक खास नियम आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी पुरुषांनी चामड्यापासून बनलेल्या सर्व वस्तू उदा. बेल्ट, पॉकेट मंदिराबाहेरच काढून ठेवणे आवश्यक आहे. पुरुषांनी कंबरेच्या वर घातलेले शर्ट, जॅकेट काढून ठेवावे लागते. या नियमाचे पालन केले तरच गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो.


असे स्थापित झाले घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग...
पुरातन काळी वेरूळ येथे सुधर्मा नावाचा शिवभक्त ब्राह्मण राहात असे त्याची बायको सुदेहा ही वज्ञा होती, म्हणून ती नेहमी दुःखी असे. एके दिवशी ती आपल्या पतीस म्हणाली महाराज आपणास पुत्र नाही, आपण दुसरा विवाह करावा. माझी बहीण खूप धार्मिक व सज्जन आहे. आपण तिच्याशी विवाह करावा म्हणजे आपणास पुत्र होईल. कालांतराने घृष्णेचे लग्न सुधर्माशी झाले घृष्णा ही खूप धार्मिक होती. तिची महादेवांवर फार निष्ठा होती. ती दररोज 101 पार्थिव लिंग तयार करून त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा पाठ करून सरोवरात विसर्जन करत होती. कालांतराने शिवाने तिला पुत्र दिला. सुधर्मा व घृष्णेला खूप आनंद झाला पण इकडे सुदैहेला मत्सर झाला. तिला वाटले हिला पुत्र झाला हिचे खूप कौतुक होत आहे आणि त्यामुळे तिने मनाशी निश्चय केला की घृष्णेला खूप दुःख द्यायचे. एके दिवशी रात्री तिला खूप घृणा आली ती उठली व घृष्णेचा पुत्र झोपला होता तेथे आली. ती द्वेषाने आंधळी झाली होती तिने मुलाला ठार मारले व पोत्यात घालून जवळच्या सरोवरात टाकले जेथे घृष्णा रोज पार्थिव पूजा करून लिंग करून सरोवरात अर्पित असे.

सकाळी उठून घृष्णा सरोवरा जवळ गेली. हातावर वाळूचे पार्थिव लिंग तयार करून शास्त्रोक्त पद्धतीने पूजापाठ करून ते लिंग सरोवरात अर्पण करण्यास निघाली तात्काळ तेथे शिव प्रकट झाले आणि म्हणाले घृष्णा मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो असून तुला वर द्यावयास आलो आहे. तू पाहिजे ते माग. घृष्णेच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले ती म्हणाली मला काही नको. शिव म्हणाले तुझ्या बहिणीने तुझा पुत्र मारला आहे तिला काय दंड देऊ सांग. घृष्णा म्हणाली असे करू नका. शिव प्रसन्न झाले तिचा मुलगा जिवंत झाला घृष्णा हर्षमय होऊन शिवाची स्तुती करू लागली.


कंठी रुंड , सुआक्ष भाळ , शिरशी मंदाकिनी चंद्रमा !
नंदी वाहन नाग विभूषित तनुसंगे मृडांगी उमा !

हस्ती शंख , त्रिशूळ , खड्ग डमरू भस्मांग , व्याघ्रयांबर, ऐसा तो नयना पुढे प्रगटला साक्षात घृष्णेश्वर ॥


घृष्णा म्हणाली देवा मला काही नको , माझ्या नावाने आपण येथे ज्योतिर्लिंग रूपात प्रगट होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात जो कोणी घृष्णेश्वरास भक्ती व श्रद्धेने पूजन करील त्याचे सर्व पाप नाहिशे होती आणि म्हणूनच वेरूळ येथे घृष्णेचा ईश्वर म्हणजे घृष्णेश्वर प्रगट झाले.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कसे आहे मंदिर आणि इतरही रोचक माहिती...

या मंदिराचा अर्धा भाग लाल पाषाणात असून वरच्या भागावर दशावतार, शंकर पार्वतीच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत मंदिराचा कळस सुवर्णचा आहे. 1791 मध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या सासू गौतमीबाई यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला मंदिर हेमाडपंती असून त्यामध्ये स्वयंभू पिंड आहे.सभामंडप दगडी असून 24 खांबावर आधारलेला आहे देवाचा गाभारा 17 बाय 17 फूट असून लिंग पूर्वाभिमुख आहे सभामंडपात नंदिकेश्वराची मूर्ती आहे भांडारलेखावरून भोसले घरण्याचाही मंदिराशी संबध येतो काशीखंडातही ज्योतिर्लिंगाचा उल्लेख आहे.घृष्णेश्वराची त्रिकाल आरती पूजा होते पूजेचा मान मुख्य पुजारी रवींद्र पुराणिक यांच्यासह ईतर पुजाऱ्याना आहे. पहाटे पाच वाजता मंदिर उघडल्यानंतर पहिली आरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले होते. दुपारी 12 व रात्री 8 वाजता आरती होते. दुपारी 12 ते 1 दरम्यान अन्नदान होते. यावेळी जलाभिषेक बंद राहातो. मंदिरात अभिषेक करण्याची प्रथा आहे दही, दूध, तूप व मधाने अभिषेक केला जातो. यावेळी बेलाची पाने, धोतर्याची फुले वाहिली जातात.1984 मध्ये ट्रस्टची स्थापना करण्यात आली मंदिराचे संवर्धन व संरक्षणाची जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे.वर्षप्रतिपदा, नागपंचमी, श्रावणातील प्रत्येक सोमवार, नारळी पौर्णिमा, विजयादशमी, दिवाळी लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा या सणांना देवाची पोशाख अलंकार पूजा होते. श्रावणातील सोमवार व महाशिवरात्रीला मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठी गर्दी होते. श्रावण महाशिवरात्रीला मंदिर ते शिवालय तिर्थापर्यंत पालखी मिरवणूक काढली जाते.मंदिराभोवती संरक्षण भिंत आहे मंदिर परिसरात अन्नदान केले जाते भाविकांसाठी ट्रस्टचे भक्तनिवास आहे घृष्णेश्वराच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना वेरूळ लेणी, म्हैसमाळ या पर्यंटनस्थळांचेही आनंद घेण्याची संधी आहे.
X
COMMENT