श्रावण / श्रावणात दान केल्याने मिळते सुख, वैभव आणि ऐश्वर्य, प्राप्त होते ईश्वर कृपा

रुद्राक्ष दान केल्याने वाढते ऐश्वर्य

दिव्य मराठी

Aug 10,2019 12:10:00 AM IST

हिंदू धर्मामध्ये दान-पुण्याचा महिमा प्रत्येक ग्रंथामध्ये आढळून येतो. श्रावण मासातही विविध सुख, वैभव आणि पुण्य प्राप्त करण्यासाठी दान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे. ज्या व्यक्तीला दान केल्याने आनंद मिळतो, त्याला परमेश्वराची अनंत कृपा प्राप्त होते, कारण दान करणे व्यक्तीला श्रेष्ठ आणि सत्कर्मी बनवते.


रुद्राक्ष दान केल्याने वाढते ऐश्वर्य
अभिषेक, शिवपुराण कथा वाचन-श्रवण, जप इ. गोष्टी केल्यानंतर दानाचे महत्त्व अधिक वाढते. श्रावण मासात चांदीचे दोन नाणे दान करणे श्रेष्ठ मानले जाते. महादेव मंदिरात वैदिक ब्राह्मणाला रुद्राक्ष माळ किंवा सोन्यापासून निर्मित सर्प जोडीचे दान करणे ऐश्वर्य वाढणारे मानले जाते.


दीपदान प्रमाणे आणि विद्यादान
श्रावण मासात दररोज दीपदान करण्याचे विशेष महत्त्व आहे. दीप म्हणजे ज्ञान प्रकाश. प्रकाश करण्याची प्रेरणा दीपपूजनमध्ये आहे. स्पष्ट सांगायचे झाल्यास, आपण विद्यादानही करणे आवश्यक आहे. विद्यादान केल्याने महादेव प्रसन्न होतात. श्रावण मासात बिल्वपत्र, शमीपत्र, आवळा या वृक्षांचे दान आणि वृक्षरोपण करणे श्रेष्ठ राहते.

X