आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणा झिम्मा खेळत ये, घन सावळ्या साेबत धरत्रीच्या भेटीला ये!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळ्या-निळ्या गाभुळलेल्या मेघांच्या सावलीत बुडालेली गर्द हिरवळ अन‌् काेवळ्या सूर्यकिरणांची साेनेरी पखरण, लक्ष वेधून घेणारी पिवळीशार फुले असं श्रावणाच्या चाहुलीचं चैतन्यदायी गाणी गाणाऱ्या निसर्गाचं चित्र जैन हिल्स परिसरातून टिपलय निसर्गप्रेमी तुषार बुंदे यांनी.

 

श्रावण मास अाजपासून : निसर्गाच्या रंगरुपाचं भरजरी लेणं असलेला श्रावण महिना रविवारपासून सुरू हाेत अाहे. अागमनाची चाहूल लागली तरी यंदा पावसाचा मागमूसही दिसत नाही. मात्र, जूनमधील पावसामुळे जळगावातील जैन हिल्स परिसर हिरवाईने नटला अाहे. तेथून टिपलेलं दृश्य नजरेसमाेर अाल्यावर 'हरित शालूवर श्रावणमासी पुष्पांची उधळण, गर्भधारिणी धरती ल्याली बहुरंगी भूषण' या कवितेच्या अाेळी अाठवत नसतील तरच नवल. एकीकडे असं चित्र दिसतं असलं तरी गेल्या वर्षासारखं श्रावणाच्या स्वागतासारखं वातावरण नाहंी. म्हणून 'श्रावणा झिम्मा खेळत ये, घन सावळ्या साेबत धरत्रीच्या भेटीला ये', अशी अाळवणी करावी लागत अाहे.

 

यंदा श्रावणाची पूर्वसंध्या गेली काेरडी
जिल्ह्यात सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७०२.४ मि.ली. आहे. १० ऑगस्टअखेर ५१.६ टक्के पाऊस झाला. जून ते १० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात २२ दिवस पावसाचे राहिलेआहेत. यात जून महिन्यात ९ दिवस तर जुलै महिन्यात १३ दिवस पावसाची नोंद झाली. यंदा श्रावणाची पूर्वसंध्याही वरूणराजाच्या प्रतीक्षेत काेरडीच गेली.

 

रंग रंगात रंगला श्रावण : यंदा तहानलेली धरत्री तृप्तीची ढेकर देईल. असा पाऊस अद्यापपर्यंत झालेला नाही. गेल्या दीड महिन्यात जाे रिमझिम, मध्यम पाऊस झाला, त्याचा थेंबन‌् थेंब रिचवून हिरवाई बहरली अाहे. पाने-फुले, वेलींचे रंगीबेरंगी चित्र पाहिल्यावर 'रंग रंगात रंगला श्रावण, नभ नभात उतरला श्रावण' या अाेळींची अनुभूती अापसूक येते. रविवारपासून अागमन हाेणाऱ्या श्रावणाच्या साेबतच गेल्या तीन अाठवड्यांपासून दडी मारलेल्या पावसाचे अागमन झाले तर खऱ्या अर्थाने चराचरात चैतन्य संचारल्याचा प्रत्यय अाल्याशिवाय राहणार नाही.

बातम्या आणखी आहेत...