आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

श्रावण : शनिदेवच नाही तर महादेव आणि श्रीगणेशालाही अर्पण करू शकता शमीचे पान

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या श्रावण मास सुरु असून या महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते. शिवलिंगावर वेगवेगळ्या गोष्टी अर्पण केल्या जातात. शिवपुराणानुसार शिव पूजेमध्ये फुल-पानं अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. शिवलिंगावर प्रामुख्याने बेलाचे पान अर्पण केले जाते परंतु यासोबतच शमी झाडाचे पान अर्पण करण्याचीही महत्त्व आहे. सामन्यतः शमीचे पान शनिदेवाला अर्पण केले जाते परंतु या झाडाची पाने महादेव आणि श्रीगणेशालाही अर्पण करू शकता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, शमी झाडाच्या काही खास गोष्टी...

# प्रभू श्रीरामांनी केले होते शमी वृक्षाचे पूजन 
पं. शर्मा यांच्यानुसार शमी वृक्षाला पूजनीय मानले जाते. याच कारणामुळे लंका विजयानंतर श्रीरामांनी या झाडाची पूजा केली होती. आणखी एका मान्यतेनुसार, महाभारत काळात पांडवांनी अज्ञातवासामध्ये शमीच्या झाडावर आपले अस्त्र-शस्त्र लपवले होते. या कारणामुळे शमीचे जास्त महत्त्व आहे.

अशाप्रकारे अर्पण करावे शमीचे पानं
श्रावण महिन्यात दररोज सकाळी शिव मंदिरात जाऊन तांब्याच्या कलशात गंगाजल किंवा शुद्ध पाणी घेऊन त्यामध्ये तांदूळ, पांढरे चंदन टाकावे. त्यानंतर 'ऊँ नम: शिवाय' मंत्राचा उच्चार करत शिवलिंगावर पाणी अर्पण करावे. त्यानंतर शिवलिंगावर तांदूळ, बेलपत्र, पांढरे वस्त्र, जाणवे आणि मिठाईसोबतच शमीचे पानं अर्पण करा.


शमीचे पान अर्पण करताना खालील मंत्राचा उच्चार करावा
अमंगलानां च शमनीं शमनीं दुष्कृतस्य च।
दु:स्वप्रनाशिनीं धन्यां प्रपद्येहं शमीं शुभा
म्।।

शमी पत्र अर्पण केल्यानंतर धूप, दीप आणि कापूराने महादेवाची आरती करा. यानंतर प्रसाद ग्रहण करा.

0