Shravan / श्रावण : शिवलिंगाची पूजा करताना अवश्य लक्षात ठेवाव्यात या 7 गोष्टी

शिवलिंग महादेवाचे निराकार रूप आहे. शिवलिंग पुजेशी संबंधित अनेक नियम धर्म ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या अशाच काही नियमांविषयी...

रिलिजन डेस्क

Aug 22,2019 12:15:00 AM IST

या वर्षी 2 ऑगस्ट शुक्रवारपासून श्रावण मास सुरु झाला असून हा पवित्र महिना 30 ऑगस्ट शुक्रवारपर्यंत राहील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार श्रावण महिन्यात महादेवाच्या विशेष पूजेचे महत्त्व आहे. यामुळे या महिन्यात प्रमुख शिव मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी राहते. शिवलिंग महादेवाचे निराकार रूप आहे. शिवलिंग पुजेशी संबंधित अनेक नियम धर्म ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही नियमांविषयी सांगत आहोत.


1. शिवलिंगाची पूजा कधीही जलधारीसमोर उभे राहून करू नये.


2. शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये, कारण जलधारीला ओलांडले जात नाही.


3. शिवलिगनवर हळद, मेहंदी चुकूनही अर्पण करू नये, कारण ही देवी पूजन सामग्री आहे. यामुळे शिव पूजेत या गोष्टी वर्ज्य आहेत.


4. शिवलिंगावर कधीही शंखाने जल अर्पण करू नये. शिवपुराणानुसार, महादेवांनी शंखचूड नावाच्या दैत्याचा वध केला होता. शंख याच दैत्याच्या हाडांपासून बनलेला आहे. यामुळे शिवलिंगावर शंखाने जल अर्पण करू नये.


6. शिवलिंगाची पूजा करताना मुख दक्षिण दिशेला असू नये.


7. पूजा करताना शिवलिंगाच्या वरील भागाला स्पर्श करू नये.

X
COMMENT